29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगावातील भिकू चौकात एका दुचाकीत बॉम्बस्फोट झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तपासाची सूत्रे दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्यात आली. एटीएसने आपल्या तपासाची चक्रे वेगाने फिरवत साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतर आरोपींना अटक केली होती. एनआयए विशेष कोर्टाने आज साध्वी यांची निर्दोष सुटका केली. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी म्हटले की, माझा अपमान झाला, वारंवार संघर्ष करावा लागला. मी संन्यासी आहे म्हणून जिवंत असल्याची भावना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केली. माझं आयुष्य उद्धवस्त करण्यात आलं. आजच्या निकालानंतर हिंदुत्वाचा विजय झाला. दोषी नसताना कलंकित करण्यात आल्याची भावना साध्वी प्रज्ञा सिंह यांनी व्यक्त केली.
advertisement
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक का?
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने मालेगाव स्फोटाचा तपास सुरू केल्यानंतर स्फोटात वापरण्यात आलेली दुचाकी ही साध्वी प्रज्ञा यांची असल्याची माहिती समोर आली. साध्वी प्रज्ञा यांचा एक कॉल रेकोर्डही एटीएसला सापडला. त्यात साध्वी प्रज्ञा यांनी फक्त 6 जणच ठार झाले, असे म्हटले. एटीएसला आणखी काही पुरावे सापडले होते. त्याआधारे साध्वी प्रज्ञा यांना अटक करण्यात आली. स्फोटात वापरेली दुचाकी आपण विकली होती, त्याच्याशी आपला काही संबंध नसल्याचा दावा साध्वी यांनी केला होता. आज कोर्टाने आपल्या निकालात साध्वी प्रज्ञा यांच्यावरील आरोपांसाठी सबळ पुरावे नसल्याचे सांगितले.