TRENDING:

घरातून शाळेला निघाला, पण अर्णव पोहोचलाच नाही, वाटेत घडलं भयंकर, पंचक्रोशीत हळहळ!

Last Updated:

Sangli News: मुलाला मदत करण्याऐवजी डंपर चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. निष्पाप मुलाचं असं जाणं मनाला चटका लावून गेलं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सांगली: कुठला दिवस कोणासाठी काय वेळ घेऊन उजाडेल सांगता येत नाही. अशाच एका दुर्घटनेच्या प्रसंगाने सांगली जिल्हा हळहळला आहे. पलूस-आमणापूर रस्त्यावरील श्री बझारसमोर डंपरने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. पलूसमधील कुसमेश्वर व्यायाम मंडळ, 11वी तालीम येथील अर्णव अमित पवार असे मृत बालकाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी, 27 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता घडली. अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
घरातून शाळेला निघाला, पण अर्णव पोहचलाच नाही, वाटेत घडलं भयंकर, पंचक्रोशीत हळहळ!
घरातून शाळेला निघाला, पण अर्णव पोहचलाच नाही, वाटेत घडलं भयंकर, पंचक्रोशीत हळहळ!
advertisement

याबाबत अधिक माहिती अशी, अर्णव हा पलूस येथील लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यालयाचा विद्यार्थी होता. मंगळवारी सकाळी तो सायकलच्या टायरमध्ये हवा भरण्यासाठी रस्त्याकडेच्या एका दुकानात गेला. हवा भरून शाळेकडे निघाला असताना, पलूस-आमणापूर रोडवर श्री बझारसमोर वेगाने आलेल्या डंपरने (क्र. एमएच 10 डीटी 8050) त्याच्या सायकलला जोराची धडक दिली. अर्णव डंपरच्या मागील बाजूच्या डाव्या चाकाखाली सापडला. डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेमुळे पलूस शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

advertisement

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला, चाकू फुफ्फुसात अडकला, सांगली हादरलं

चालकाचे पलायन

अपघात घडल्यानंतर जखमी मुलाला मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना खबर देण्याऐवजी डंपर चालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. पोलिस अज्ञात चालकाचा शोध घेत आहेत.

भरधाव वाहनांना आवर घालण्याची मागणी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
व्यवसायासाठी बहिणींनी नोकरी सोडली, सुरू केला मोमोज स्टॉल, महिन्याला 1 लाख कमाई
सर्व पहा

निष्पाप अर्णवला जीव गमवावा लागला. तेव्हा डंपरचालकाने घटनास्थळावरून पलायन केले. बेदरकार वाहन चालकांमुळेच शहरातील रस्ते मृत्यू सापळे बनत असल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पलूस शहरातील मुख्य रस्त्यावरून अवजड वाहनांची भरधाव वाहतूक सातत्याने सुरू असते. शहरातील अरुंद रस्ते, सततची वाहतूक कोंडी यामुळे शाळकरी मुलांसह बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांना अपघाताचा सामना करावा लागतो.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
घरातून शाळेला निघाला, पण अर्णव पोहोचलाच नाही, वाटेत घडलं भयंकर, पंचक्रोशीत हळहळ!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल