नेमकं झालं असं
25 वर्षाच्या नयन पांढरे याने संदेशला शुक्रवारी त्याची दुचाकी मागितली होती. मात्र काही कारणाने संदेशने दिली नाही. याच गोष्टीचा राग नयनने डोक्यात ठेवला; आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास कसबे डिग्रज गावच्या कमानीतून घरी निघालेल्या 22 वर्षीय संदेशला गाठलं. 'काल दुचाकी का दिली नाहीस' म्हणून धारदार कोयत्याने हल्ला केला. संदेशने बचावासाठी हात पुढे केल्यानंतर डाव्या हातावर वार लागून जखमी झाला. त्यानंतर देखील नयनने मारहाण केली.
advertisement
तुमची मुलगी माझ्या पतीला फोन का करते? सांगलीत राडा, 80 वर्षाच्या वृद्धासह महिलेसोबत...
परिसरात खळबळ
अगदी किरकोळ कारणातून मित्रानेच मित्रावर हल्ला केल्याच्या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली. तसेच विशी-पंचविशीतील तरुणांत वाढत्या गुन्हेगारीचे प्रकार चिंताजनक आहेत. मुलांनी संयम बाळगावा आणि रागावर नियंत्रण ठेवावे, असे नागरिकांकडून सांगण्यात आले. या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस अधिक तपास करीत आहेत.






