रात्री 10 वाजताची वेळ, पत्ता विचारला अन् स्प्रे मारला, सांगलीच्या तरुणासोबत भयंकर घडलं
- Reported by:Priti Nikam
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Sangli News: प्रतीक हा मार्ग सांगत असतानाच दुसऱ्याने प्रतीक याच्या तोंडावर कशाचा तरी स्प्रे मारला. यामुळे प्रतीक बेशुद्ध पडला.
सांगली: एखाद्याला मदत करणं देखील काही वेळा अंगलट येऊ शकतं. असाच काहीसा प्रकार सांगलीतील तरुणासोबत घडला आहे. मिरज तालुक्यातील कवलापूर येथे पत्ता विचारण्याचा बहाणा करून दुचाकीस्वाराला थांबवलं आणि चेहऱ्यावर स्प्रे मारून बेशुद्ध केलं. तसेच दुचाकीसह रोकड लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं घडलं काय?
तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील 28 वर्षीय तरुण प्रतीक दिनेश पवार हा सांगलीत खासगी नोकरी करतो. सोमवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास तो दुचाकीवरून घरी निघाला होता. कवलापूर गावच्या हद्दीत एका पेट्रोलपंपाजवळ आला असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने दोघांनी त्याला थांबवले. संशयितांनी तोंडाला रुमाल बांधला होता. त्यातील एकाने तासगावला जाण्याचा रस्ता विचारला.
advertisement
रस्ता सांगतानाच चेहऱ्यावर स्प्रे मारला
प्रतीक हा मार्ग सांगत असतानाच दुसऱ्याने प्रतीक याच्या तोंडावर कशाचा तरी स्प्रे मारला. यामुळे प्रतीक बेशुद्ध पडला. त्याचा फायदा घेऊन दोघांनी त्याची दुचाकी, मोबाईल आणि सहा हजार रुपये रोकड घेऊन पळाले. काही वेळानंतर प्रतीकला जाग आली. तेव्हा नागरिकांच्या मदतीने तो घरी पोहोचला. मंगळवारी सायंकाळी त्याने सांगली ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली. कवलापूर येथील सीसीटीव्हीमध्ये पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
advertisement
सावध राहण्याची गरज
view commentsअलीकडे नवनवीन युक्त्या वापरून चोऱ्या- लबाड्या करण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांनी अत्यंत सतर्क राहण्याची गरज आहे, असं सांगली पोलिसांनी म्हटलंय.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
Jan 08, 2026 9:17 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
रात्री 10 वाजताची वेळ, पत्ता विचारला अन् स्प्रे मारला, सांगलीच्या तरुणासोबत भयंकर घडलं










