मित्रांसोबत Skiing करताना अपघात, उपचारानंतर Heart Attack, वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्या मुलाचा मृत्यू

Last Updated:

'बापाच्या खांद्यावर लेकाचं पार्थिव, यापेक्षा मोठं दुःख काय?' थरथरते हात अन् डबडबलेले डोळे, वेदांताचे अनिल अग्रवाल यांची भावुक पोस्ट

News18
News18
वडिलांच्या खांद्यावरुन तरुण मुलाच्या पार्थिवाची अत्यंयात्रा काढण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव दुसरे कोणते असू शकते? आज माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद दिवस... थरथरते हात आणि पाण्याने डबडबलेले डोळे आणि अखेर ते सोशल मीडियावर व्यक्त झाले. वेदांता समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनिल अग्रवाल यांचा ४९ वर्षीय मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने अमेरिकेत निधन झालं. या वृत्ताने उद्योग जगतात आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली.
अपघातानंतर सावरला होता, पण काळाने गाठले...
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निवेश आपल्या मित्रांसोबत अमेरिकेत Skiing करण्यासाठी गेला होता. तिथे झालेल्या एका अपघातात तो जखमी झाला. न्यूयॉर्कमधील माउंट सिनाई रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते आणि तो हळूहळू सावरत होता. कुटुंबियांना तो लवकरच घरी येईल अशी आशा होती, मात्र अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाला.
advertisement
बॉक्सिंग चॅम्पियन ते यशस्वी उद्योजक
अग्निवेशचा जन्म ३ जून १९७६ रोजी पाटण्यातील एका मध्यमवर्गीय बिहारी कुटुंबात झाला होता. अजमेरच्या मेयो कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेला अग्निवेश हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी होता. तो बॉक्सिंग चॅम्पियन होता, त्याला घोडेस्वारीची आवड होती आणि तो एक उत्तम संगीतकारही होता. त्याने 'फुजैराह गोल्ड' सारखी मोठी कंपनी उभी केली आणि 'हिंदुस्थान झिंक'चा चेअरमन म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.
advertisement
फक्त मुलगा नव्हता, तर मित्र होता!
आपल्या मुलाच्या आठवणीत अनिल अग्रवाल लिहितात, "अग्नि अत्यंत साध्या स्वभावाचा होता. तो जितका कर्तृत्ववान होता, तितकाच जमिनीशी जोडलेला माणूस होता. तो माझा केवळ मुलगा नव्हता, तर माझा मित्र आणि माझी शान होता. त्याने आणि मी मिळून भारताला आत्मनिर्भर बनवण्याचे स्वप्न पाहिले होते." मुलाच्या निधनाने अनिल आणि किरण अग्रवाल हे दाम्पत्य पूर्णपणे खचले आहे. मात्र, मुलाला दिलेल्या शब्दाची आठवण करून देत अग्रवाल यांनी एक मोठा संकल्प जाहीर केला.
advertisement
"मी अग्निवेशला वचन दिले होते की, आमच्याकडे जे काही धन येईल, त्यातील ७५ टक्क्यांहून अधिक हिस्सा आम्ही समाजासाठी खर्च करू. आज मी ते वचन पुन्हा सांगतो. आता उर्वरित आयुष्य मी अधिक साधेपणाने जगून समाजसेवेसाठीच वाहून घेईन," असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. अग्निवेशच्या मागे आई-वडील, पत्नी, बहीण प्रिया आणि मोठा मित्रपरिवार असा परिवार आहे. एका जिद्दी आणि जिंदादिल तरुणाच्या अशा अकाली जाण्याने हळहळ व्यक्त केली आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
मित्रांसोबत Skiing करताना अपघात, उपचारानंतर Heart Attack, वेदांताचे अनिल अग्रवाल यांच्या मुलाचा मृत्यू
Next Article
advertisement
BJP Shiv Sena UBT Clash: मुंबईत प्रचाराला गालबोट, भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, राड्यानंतर पोलीस अॅक्शन मोडवर
मुंबईत प्रचाराला गालबोट, भाजप-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, राड्यान
  • प्रचाराने वेग घेतला असून आरोप-प्रत्यारोपांचा धुरळा उडू लागला आहे.

  • मुंबईत प्रचाराला गालबोट लागल्याची घटना घडली.

  • भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते भिडले असल्याची घटना घडली.

View All
advertisement