TRENDING:

महाराष्ट्रातील अ वर्ग प्राप्त असलेलं पहिलं प्रति पंढरपूर जिथं भरतो वैष्णवांचा मेळा, हे आहे लोकेशन

Last Updated:

काही लोकांना इच्छा असूनही पंढरपूरला जाता येत नाही. अशा लोकांसाठी आनंदाची बातमी आहे. हे लोक करहर एका ठिकाणी विठु माऊलीच्या दर्शनासाठी जाऊ शकतात. या ठिकाणाला प्रति पंढरपूर म्हणतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी
advertisement

सातारा : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले विठ्ठलाच्या वास्तव्याचे स्थान म्हणजे पंढरपूर होय. प्रत्येकाला वर्षातून एकदा तरी पंढरपूरला जावे असे वाटते. विठ्ठलाचे दर्शन घ्यावे ही मनोभावे इच्छा असते. याच इच्छेने पंढरपूर या चंद्रभागेच्या काठावर असलेल्या या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दर्शनासाठी दरदिवशी लाखो भाविक येतात. मात्र, काही लोकांना इच्छा असूनही आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता येत नाही.

advertisement

म्हणून लोकं साताऱ्याजवळील जावली तालुक्यात असलेल्या करहर या ठिकाणी विठु माऊलीच्या दर्शनासाठी जातात. या ठिकाणी असलेल्या विठ्ठल-रुख्मिणीच्या मंदिराला प्रति पंढरपूर असे म्हणतात. साताऱ्यातील करहर गावात असलेले हे विठ्ठल-रुख्मिणीचे मंदिर महाराष्ट्रातील पहिलं अ दर्जा प्राप्त असलेले प्रति पंढरपूर आहे.

सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात असलेलं करहर गाव साताऱ्यापासून 35 ते 38 किलोमीटर अंतरावर वसलेले आहे. या मंदिरात जे वारकरी, भक्तगण, लहान मुले, त्याचबरोबर वृद्ध पंढरपूरला जाऊ शकत नाहीत, ते सर्वजण या प्रति पंढरपूर येथे येतात. आषाढी एकादशीला याठिकाणी भाविकांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

advertisement

View More

उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशनचा पुढाकार, विठुरायाच्या वारीत राबवला जातोय पर्यावरणपूरक उपक्रम, काय आहे हा उपक्रम

आषाढी एकादशीला दिवशी पंचक्रोशीतून त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील अनेक गावातून वाऱ्या या गावात येतात. जिल्हा परिषदच्या शाळेतील लहान मुले, वेगवेगळ्या संत महात्म्यांचे वेशभूषा परिधान करतात आणि या पालखी सोहळ्याला उपस्थिती लावतात. त्याचबरोबर महिला डोक्यावर तुळस घेऊन, पुरुष मंडळी गळ्यात टाळ घेऊन या पालखी सोहळ्यात सहभागी होतात.

advertisement

करहर येथील प्रति पंढरपूर मंदिराचे वैशिष्ट्य -

मंदिराच्या स्थापनेबाबत विचार केला असता, विठू माऊलीची मूर्ती स्वयंभू असल्याची अख्खायिका सांगितली जाते. याच विठू माऊलीच्या मूर्तीजवळ संत ज्ञानेश्वरांचीही मूर्ती आहे. मंदिराचे बांधकाम एकदम भव्य आणि मन आकर्षण करणारे आहे. मंदिर परिसरातून तुम्हाला पंढरपूरला आल्याची अनुभूती होते. असा सुसज्ज परिसर आणि स्वच्छ परिसर या करहर गावातील मंदिराजवळ आहे.

advertisement

वारी 2024 : तुकोबांची पालखी निवडुंग्या विठोबा मंदिरात, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी, VIDEO

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अतिवृष्टीचा फटका, बबन यांच्या सीताफळाचे मोठं नुकसान, खर्च निघणे झालं अवघड
सर्व पहा

मागील 50 वर्षापासून या मंदिरात आषाढी एकादशीचा कार्यक्रम, पालखी सोहळा होतो. जावली तालुक्याचे भूषण वैकुंठ निवासी गुरुवर्य हरिभक्त परायण दत्तात्रय महाराज कळंबे यांनी जावली तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वारकरी संप्रदाय वाढवला. तेसुद्धा या करहरमधील विठू माऊलीचे दर्शन घेत असत, अशी येथील जुनी जाणकार मंडळी सांगतात.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
महाराष्ट्रातील अ वर्ग प्राप्त असलेलं पहिलं प्रति पंढरपूर जिथं भरतो वैष्णवांचा मेळा, हे आहे लोकेशन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल