TRENDING:

72 फिरत्या भिंगऱ्या अन् 56 लोखंडी सुळे, साताऱ्यातील संग्रहालयाच्या सुरक्षेसाठी तब्बल अडीच टन वजनाचा दरवाजा

Last Updated:

हा दरवाजा पोलाद आणि बिडाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या दरवाज्याचे वजन तब्बल अडीच टन इतके आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी 
advertisement

सातारा : साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे काम प्रगतीपथावर असून, या संग्रहालयाचा मुख्य प्रवेशद्वाराला ऐतिहासिक बांध असलेला महाकाय दरवाजा बसवण्यात आला आहे. हा दरवाजा पोलाद आणि बिडाचा वापर करून तयार करण्यात आला आहे. या दरवाज्याचे वजन तब्बल अडीच टन इतके आहे.

छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय साताऱ्याचे वैभव 

साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे साताऱ्याचे एक वैभव असल्याचे समजले जाते. साताऱ्यातील संग्रहालयाची वास्तू भव्य आणि दिव्य बांधण्यात आलेली आहे. यामध्ये अत्यंत जुन्या वस्तू आणि शस्त्र आहेत. या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा दुर्मिळ ठसा आहे. त्याचबरोबर प्राचीन काळातील मूर्ती आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजलखानाचा कोथळा ज्या वाघनखांनी फाडला ती वाघ नखे या साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत.

advertisement

छत्रपती शिवाजी महाराजांना देणार हटके मानवंदना, शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त कोल्हापूरची धावपटू 300 किलोमीटर धावणार

त्याचबरोबर साताऱ्याचे जनक छत्रपती शाहू महाराज थोरले यांचे तक्त, तोफा, तलवारी, भाले, खंजिरे, चिलखत, तोफगोळे, कपडे, तूमान, पगड्या, सोन्याची नाणी, आधी वेगवेगळ्या कालखंडातील अडीच हजाराहून अधिक वस्तूंचे संवर्धन या साताराच्या संग्रहालयात करण्यात आले आहे. या वस्तूंच्या सुरक्षिततेसाठी पुरातन विभागाकडून मुख्य प्रवेशद्वारावर अडीच टन वजनी महाकाय दरवाजा बसवण्यात आला आहे, अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय सातारा अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी दिली आहे.

advertisement

काय आहेत दरवाज्याची वैशिष्ट्ये? 

ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह असलेल्या या वस्तुसंग्रहालयाचा दरवाजाही ऐतिहासिक वाटावा, त्याचबरोबर पुरातन दिसावा, याची पुरेपूर खबरदारी घेत हा दरवाजा उभारण्यात आला आहे. या महाकाय दरवाज्याची उंची 14 फूट आहे, त्याचबरोबर हा दरवाजा 11 फूट रुंद आहे, या दरवाज्याचे वजन तब्बल अडीच टन एवढे आहे, या दरवाज्याला फिरत्या भिंगऱ्या एकूण 72 लावण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर मोठी चक्रे 16 लावण्यात आले आहेत.

advertisement

साताऱ्यातील परळी खोऱ्यात शेकडो वर्षापूर्वीच्या स्मृतीशिळाचे संग्रहालय, अनोख्या ऐतिहासिक ठेव्याचा पाहा Video

हा दरवाजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गडकिल्ल्यांना दरवाजे होते त्याच प्रमाणे असून दरवाज्यावर 56 लोखंडी सुळे आहेत. त्यांची लांबी एक फूट आहे. त्याचबरोबर हा महाकाय दरवाजा पोलाद आणि बीड या धातूपासून बनवण्यात आला आहे. उत्तम दर्जाचे पोलाद आणि लोखंडाचा वापर करून हा दरवाजा तयार करण्यात आला आहे. हा दरवाजा बनविण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देखील लागला होता. किल्ले अजिंक्यतारा आणि जिल्हा कारागृहाला बसवण्यात आलेल्या दरवाज्यानंतर भव्य दिव्य दरवाज्याची उभारणी संग्रहालय इथे करण्यात आली असल्याचे देखील संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदे यांनी सांगितले आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सातारा/
72 फिरत्या भिंगऱ्या अन् 56 लोखंडी सुळे, साताऱ्यातील संग्रहालयाच्या सुरक्षेसाठी तब्बल अडीच टन वजनाचा दरवाजा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल