सातारा: महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला ऐतिहासिक वासरा लाभलेला आहे. शिवकाळात वाईलाही मोठा इतिहास आहे. येथीलच इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी अनोखा छंद जोपासला आहे. शिवकालीन आणि त्यापेक्षा आधीच्या तोफाचा शस्त्रसंग्रह त्यांनी केला आहे. या शस्त्रसंग्रहात इशारतेची तोफ देखील आहे. या संग्रहातून शिवकालीन इतिहास जाणून घेण्यास मदत होतेय.
22 वर्षांपासून शस्त्रांचा संग्रह
advertisement
प्रसाद बनकर यांनी 22 वर्षापासून शस्त्रांचा संग्रह आणि त्याचे संवर्धन करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्याकडे शिवकालीन तलवार, भाले, वाघनखे, दांडपट्टे, ब्रिटिश कालीन तलवारी, बंदुका यासह चौदाव्या आणि पंधराव्या शतकातील हजारो शस्त्र त्याचबरोबर जुनी नाणी यांचा देखील संग्रह आहे. त्यांच्या संग्रहात एक डझनहून अधिक इशारतीच्या तोफा आहेत.
उत्तरायणात नदीच्या संगमावर का करतात पवित्र स्नान? हिंदू धर्मातील महत्त्व माहितीये का?
इशारतीची तोफ खास आकर्षण
नुकतेच काही कामानिमित्त सांगली येथे गेले असताना त्यांना एका मोठ्या घराण्यातील सदस्यांनी इशारतीची तोफ दिली आहे. तिची लांबी 11 इंच, अत्यंत सुंदर नक्षीकाम असलेली ही तोफ 17व्यां शतकातील असल्याचे म्हटलं जातंय.
या तोफांचा वापर कसा व्हायचा?
इशारतेच्या तोफाचा उल्लेख इतिहासात 'जम्बुरा' म्हणून आढळतो. लढाईत या इशारतेच्या तोफेचा वापर उंटाच्या पाठीवर किंवा घोड्याच्या पाठीवर ठेऊन केला जायचा. या तोफांचा वाड्याची शोभा वाढविण्यासाठी सुद्धा वापर होत असे. त्याचप्रमाणे राजघराणे, सरदार घराणे किंवा मोठ्या व्यक्तींच्या वाड्यात देवघरा बाहेर या तोफांचा वापर करण्यात येत होता.
हे आहे जगातील पहिलं शिवलिंग, स्वत: भगवान शंकर अन् माता पार्वतीने केली होती स्थापना
गेले 22 वर्षापासून या शस्त्राच्या संग्रहाच्या माध्यमातून 5 इंच पासून 21 ते 23 इंचापर्यंत असलेल्या इशारतेच्या तोफांचा संग्रह केला आहे. या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा, सरदारांचा गौरवशाली इतिहास नव्या पिढी पुढे मांडता येईल. यासाठी याचा संग्रह करत असल्याचे प्रसाद बनकर यांनी सांगितले.