सातारा : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कासच्या पठारावर सातारीतुरा उमलला आहे. हजारो पर्यटकांच्या मनावर राज्य करणारे कास पुष्प पठारावर साताराऩ्सिस हे फुल जून महिन्यातील पावसात दर्शन देऊ लागले आहे. त्यामुळे कास पठारावर पावसाळ्यात फिरायला जाणाऱ्या पर्यटनाकासाठी नैसर्गिक सौंदर्य पाहण्याची चांगली संधी आहे. या फुलाबद्दच आपल्याला साताऱ्यातील कास पठार निवृत्त वनपाल श्रीरंग शिंदे यांनी दिली आहे.
advertisement
दुर्मिळ वनस्पतीपैकी एक
सातारीतुरा फुलाला शास्त्रीय भाषेत अपोनोजेटॉन साताराऩ्सिस म्हणून ही ओळखले जाते. दुर्मिळ वनस्पती पैकी मुळाशी कंद असणारे हे भोई ऑर्किड आहे. पहिला पाऊस झाल्यानंतर सह्याद्रीच्या काही भागात खडकात मातीच्या भाग आणि वाहणाऱ्या पाण्याच्या जवळील परिसरात त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी साचते अशा ठिकाणी ही वनस्पती आढळते. जमिनीत छोटा कंद असतो त्यावर येणारे पान हे लांब आणि जाडसर आकाराचे असते वाय शेपमध्ये भाल्यासारखे दिसते, असं श्रीरंग शिंदे सांगतात.
पावसाळ्यात फिरण्यासाठी लोकेशन शोधताय? ही आहे ठाण्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळे, photos
सातारीतुरा हे पानांमध्ये अन्नसाठा भरपूर प्रमाणात साठवत असते. दोन ते तीन पानाच्या बेचक्यातून लांब आणि जाडसर अशा दांड्यात इंग्रजीमध्ये वाय आकाराचा तुरा येतो म्हणून यास वायतुरा असे देखील म्हणतात. सातारी तुरा हे फुल केवळ सातारच्या पश्चिम भागात चार ते पाच ठिकाणी आढळते म्हणून या सातारी तुरा म्हणतात. सातारीतुरा वनस्पती कास पठार आणि परिसरातील जैवविविधतेचे भूषण ओळखले जाते, असं श्रीरंग शिंदे सांगतात.
छत्रपती संभाजीनगरच्या 4 वर्षांच्या चिमुरडीची कमाल, केला नवीन वर्ल्ड रेकॉर्ड
सुट्टीच्या दिवशी कास तलाव परिसरात पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतानाचे चित्र आपल्याला पाहायला मिळते. सातारीतुरा वनस्पतीचे दर्शनाने आनंदाचे वातावरण पर्यटकांच्या दिसून येते, अशी माहितीही निवृत्त वनपाल कास पठार श्रीरंग शिंदे यांनी दिले आहे.





