मुंबई येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी महापरिनिर्वाण झाले. ही बातमी वाऱ्यासारखी संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. सोलापुरातील पांजरापोळ चौकामध्ये असलेल्या सी नरसी ट्रान्सपोर्टमध्ये निरोप आला. केरू जाधव, तुकाराम (बुवा) इंगळे, रामचंद्र जाधव, अण्णासाहेब कदम, भीमराव सरवदे, लक्ष्मण अबुटे, एन. एस. कांबळे, दराप्पा कांबळे, मेसा सिद्धगणेश, शिंदे गुरुजी, रामचंद्र रणशृंगारे आदी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले आणि 7 डिसेंबर रोजी बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यात आला.
advertisement
पाटलांच्या घरात होतेय बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा, तिसरी पिढी जपतेय परंपरा, कारण आहे खास Video
सोलापूर शहरातील आंबेडकर अनुयायी तुकाराम (बुवा) इंगळे हे चार दिवस मुंबईत राहिले आणि त्यांनी सोलापुरात बाबासाहेबांच्या अस्थिंचा कलश आणण्याचा निर्णय घेतला. पाच दिवसांनी म्हणजेच 11 डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी सकाळी 8 वाजता मद्रास मेलने सोलापुरात आणण्यात आल्या. तेव्हा मोठ्या संख्येने अनुयायी या ठिकाणी जमले होते.
सोलापुरातील हेच ठिकाण प्रेरणाभूमी म्हणून ओळखले जाते. 1956 पासून आजतागायत दरवर्षी भीमसैनिकांचा मोठा जनसागर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सोलापूर शहरातील थोरला राजवाडा येथे दाखल होतो.





