सोलापूर : मुंबईमध्ये 'अल्ट्रा' कंपनीत विविध चित्रपट आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील मालिकांचे 'एडिटिंग' करणाऱ्या सचिन जगताप यांनी सोलापूर हीच आपली कर्मभूमी मानली आणि एका वेगळ्या क्षेत्रात स्वतःचे नाव कमावले. 'सिनियर एडिटर' म्हणून उत्तम नोकरी सुरू असतानाही ती नोकरी सोडून सचिन जगताप हे सोलापूर येथे आले आणि 'मोशन फिल्म स्टुडिओ'ची त्यांनी शून्यातून सुरुवात केली. आज जाणून घेऊयात, त्यांच्या या अनोख्या प्रवासाबद्दल.
advertisement
या क्षेत्रातच करिअर करणार असा निश्चय -
आतपर्यंत त्यांनी फीचर फिल्म्स व 'टीव्ही सीरियल्स'चे 'डबिंग', 'एडिटिंग', 'म्युझिक' शॉर्टफिल्म आदी कामे त्यांनी केली. वर्ष 2000 मध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचे अधिक कौशल्य संपादन करण्यासाठी पुणे गाठले. चित्रपट आणि टीव्ही सिरियल्स निर्मितीच्या क्षेत्रातच आपण करियर करायचं, हे त्यांनी निश्चित केले होते आणि त्यानुसार नियोजनबद्ध आखणी त्यांनी केली.
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना होतोय फायदा, शासकीय दंत महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम आहे तरी काय?
पुण्यात काही दिवस काम केल्यानंतर त्यानी मुंबईत मोठ्या कंपनीत अनुभव घेतला. मुंबईत कुठल्या तरी स्टुडिओत एकाच पद्धतीचे काम करण्याऐवजी स्वतःचा फिल्म स्टुडिओ काढण्याचे सचिन यांच्या मनात पक्के होते. त्यामुळे त्यांनी सोलापूरात 'मोशन फिल्म स्टुडिओ'ची सुरूवात केली. आज स्वतःच्या जागेत त्यांचा स्टुडिओ सुरू आहे. व्यावसायिक गुणवत्तेबरोबरच आर्थिक यशालाही त्यांनी गवसणी घातली आहे.
जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!
मोशन फिल्म स्टुडीओत अनेक नामांकित व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंगची कामे पार पडत आहेत. यामध्ये विशेषतः सामाजिक, कॉर्पोरेट माहितीपट तसेच अनेक विविध समाज प्रबोधन फिल्म्स सचिन यांनी बनविल्या आहेत.
आतापर्यंत जवळपास 200 हून आधिक लघुपट, अनेक संस्था, व्यक्ती आणि सामाजिक विषयांवरील जवळपास 10 हजार माहितीपटाचे संकलन आणि निर्मिती सचिन जगताप यांनी केली आहे. यामध्ये केवळ सोलापूरचे माहितीपट, लघुपट आणि चित्रपटाच्या निर्मिती आणि एडिटिंगचे काम होते, असे नाही तर पुणे-मुंबई यासह महाराष्ट्र, भारत आणि परदेशातील कित्येक व्हिडिओची कामे करून ग्राहकांचे मन सचिन यांनी जिंकले आहे. मोशन फिल्म स्टुडिओ'ची वार्षिक उलाढाल मोठी आहे.