सोलापूर : जिद्द आणि चिकाटी असेल तर व्यक्ती अनेक अडचणींवर मात करुन आपली स्वप्ने पूर्ण करू शकतो. आज अशाच एका तरुणाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. सुरक्षा रक्षकाचा मुलगा ते पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंतचा हा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
रोहित विजय माने असे या तरुणाचे नाव आहे. तो उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलूर येथील रहिवासी आहे. रोहित माने या तरुणाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. नुकत्याच लागलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या निकालामध्ये माने याने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याचे वडील एका खासगी कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षक आहेत. त्यामुळे रोहितच्या या यशामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
advertisement
निरलेक्सच्या तव्यावर कोकणी पद्धतीने बनवा झटपट घावणे, चव अशी की पुन्हा बनवाल, सोप्या रेसिपीचा VIDEO
रोहित माने या तरुणाने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे. यासाठी त्याने पुणे, मुंबईला न जाता सोलापुरातच राहुन दररोज 10 ते 12 तास अभ्यास केला. त्याचबरोबर यासाठी कुठलाही कोचिंग क्लासेस त्याने लावला नव्हता.
रोहित मानेचे वडील विजय माने हे सोलापुरातील एका खासगी महाविद्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. तर दुर्दैवाने आईचे छत्र तीन वर्षांपूर्वीच त्याच्या डोक्यावरून हरवले आहे. त्यामुळे रोहितचा निकाल लागला त्यावेळी रोहित व त्यांच्या परिवाराला अत्यंत भावूक झाल्याचे दिसले.
पुण्यातील या गावाला म्हटलं जातं गौराईचं माहेरघर, नेमकं काय आहे यामागचं कारण?, VIDEO
4 महिन्यात कमी केलं 14 किलो वजन -
रोहित माने मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीसाठी सराव करत होता. यावेळी त्याचे वजन 92 किलो असल्यामुळे मोठी अडचण निर्माण होत होती. यावेळी विवेक तुप्पे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 महिन्यात तब्बल 14 किलो वजन कमी करण्यात रोहितला यश आले. त्याने शारीरिक चाचणी मध्येही चांगले गुण मिळविले आहेत. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर सुरक्षा रक्षकाचा मुलगा आज पोलीस उपनिरीक्षक आला आहे. अत्यंत साधारण परिस्थिती असणाऱ्या कुटुंबातील रोहितचा हा प्रवास निश्चितच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.