TRENDING:

खरीप दुष्काळी अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन

Last Updated:

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कारणामुळे अनुदान न मिळालेल्या खातेदारांना कागदपत्रांची पुर्तता करणे बाबत संबंधित तलाठी कार्यालय अथवा तहसिल कार्यालय यांच्याकडे 10 जुलै, 2024 पूर्वी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
फाईल फोटो
फाईल फोटो
advertisement

सोलापूर : 2023 मधील खरीप दुष्काळाच्या अनुषंगाने 5 लाख 19 हजार 849 बाधित शेतकऱ्यांना 689 कोटी अनुदान मंजूर झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली आहे. महसूल व वन विभागाकडील 29 फेब्रुवारी 2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये हे अनुदान मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये बार्शी, माढा, करमाळा, सांगोला आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश आहे.

advertisement

बार्शी तालुक्यातील 31395 बाधित शेतकरी, माढा तालुक्यातील 76724 बाधित शेतकरी, करमाळा तालुक्यातील 72113 बाधित शेतकरी, सांगोला तालुक्यातील 75616 बाधित शेतकरी आणि माळशिरस तालुक्यातील 77951 बाधित शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना मदत निधी वितरीत करण्यासाठी सबंधित तहसिलदार यांनी बाधित शेतकऱ्यांची यादी ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केली आहे. या यादीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजूरी दिली आहे.

advertisement

एकेकाळी डोईवर नव्हतं छत, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली थाटला संसार, आज शेतकऱ्याने फुलं विकून बांधला बंगला!

शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत जमा करण्यात आलेली आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील 21252, माढा तालुक्यातील 64871, करमाळा तालुक्यातील 62859, सांगोला तालुक्यातील 64650 आणि माळशिरस तालुक्यातील 63792, अशा एकूण 2 लाख 77 हजार 424 बाधित शेतकऱ्यांना 489 कोटी रुपयांची मदत मिळाली आहे.

advertisement

"लंडनमधील वाघनखं ही महाराजांची नाहीत, मग खरी कुठे?, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या दाव्यानंतर एकच खळबळ

सद्यस्थितीत बार्शी तालुक्यातील 3550, माढा तालुक्यातील 3240, करमाळा तालुक्यातील 1970, सांगोला तालुक्यातील 3678 आणि माळशिरस तालुक्यातील 5428 बाधित शेतकऱ्यांचे ई-केवायसी पूर्ण न झालेने रक्‍कम 21,65,56,495/-रुपये प्रलंबित आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील अंदाजित 1 लाख खातेदारांना त्यांची बँक व आधारकार्ड संलग्न नसल्याने, सामाईक खातेदारांची रक्कम कोणत्या खात्यावर जमा करावी याबाबतची संमतीपत्र दिले नसल्याने, मृत खातेदारांची वारस नोंद झाली नसल्याने तसेच परगावीच्या खातेदारांचे बॅक तपशील, आधारकार्ड तपशील इ. उपलब्ध न झाल्याने अनुदान वाटप करणे प्रलंबित आहे.

advertisement

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या कारणामुळे अनुदान न मिळालेल्या खातेदारांना कागदपत्रांची पुर्तता करणे बाबत संबंधित तलाठी कार्यालय अथवा तहसिल कार्यालय यांच्याकडे 10 जुलै, 2024 पूर्वी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
खरीप दुष्काळी अनुदान न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, प्रशासनाचे महत्त्वाचे आवाहन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल