याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 4 व 5 सप्टेंबरच्या मध्यरात्री, 5 व 6 सप्टेंबरच्या मध्यरात्री आणि 6 व 7 सप्टेंबरच्या मध्यरात्री मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कल्याण दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. याशिवाय, हार्बर मार्गावर 6 आणि 7 सप्टेंबर रोजी सीएसएमटी ते पनवेल आणि पनवेल ते सीएसएमटी अशा विशेष उपनगरीय गाड्या धावतील.
Western Railway: दसरा-दिवाळीत सहज करा प्रवास, वेस्टर्न रेल्वेचा मोठा निर्णय, कसं असेल वेळापत्रक?
advertisement
गणपती विशेष लोकल सेवेचं वेळापत्रक
डाउन मेन लाईन (6 सप्टेंबर)
सीएसएमटी ते कल्याण: सीएसएमटी येथून मध्यरात्री 1 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि आणि कल्याण येथे 3 वाजून 10 मिनिटांनी पोहोचेल.
सीएसएमटी ते ठाणे: सीएसएमटी येथून मध्यरात्री 2 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि ठाणे येथे 3 वाजून 30 मिनिटांनी पोहोचेल.
सीएसएमटी ते कल्याण: सीएसएमटी येथून 3 वाजून 25 मिनिटांनी सुटेल आणि कल्याण येथे पहाटे 4 वाजून 55 मिनिटांनी पोहोचेल.
अप मेन लाईन (4, 5, 6 आणि 7 सप्टेंबर)
कल्याण ते सीएसएमटी: कल्याण येथून मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांनी सुटेल आणि 1 वाजून 30 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.
ठाणे ते सीएसएमटी: ठाण्यातून 1 वाजता सुटेल आणि 2 वाजता सीएसएमटीला पोहचेल.
ठाणे-सीएसएमटी: ठाण्यातूल 2 वाजता सुटेल आणि 3 वाजता सीएसएमटीला पोहचेल
डाउन हार्बर लाईन (6 आणि 7 सप्टेंबर)
सीएसएमटी ते पनवेल: ही विशेष गाडी सीएसएमटी येथून 1 वाजून 30 मिनिटांनी निघेल आणि 2 वाजून 50 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.
सीएसएमटी ते पनवेल: ही गाडी सीएसएमटीवरून 2 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि 4 वाजून 5 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.
अप हार्बर लाईन (6 आणि 7 सप्टेंबर)
पनवेल ते सीएसएमटी: ही गाडी पनवेल येथून मध्यरात्री 1 वाजता सुटेल आणि 2 वाजून 20 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.
पनवेल ते सीएसएमटी: ही गाडी पनवेल येथून मध्यरात्री 1 वाजून 45 मिनिटांनी सुटेल आणि 3 वाजून 5 मिनिटांनी सीएसएमटीला पोहोचेल.