Western Railway: दसरा-दिवाळीत सहज करा प्रवास, वेस्टर्न रेल्वेचा मोठा निर्णय, कसं असेल वेळापत्रक?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Western Railway: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते.
मुंबई: गणेशोत्सवापासून देशभरात विविध मोठ्या सण-उत्सवांची सुरुवात होते. गणेशोत्सवापाठोपाठ शारदीय नवरात्री, दसरा, दिवाळी आणि छटपूजा यांसारखे मोठे उत्सव येतात. सणासुदीच्या काळात नोकरी आणि व्यवसायानिमित्त आपल्या मूळ गावापासून दूर असलेले लोक आपापल्या गावी जातात. परिणामी या काळात वाहतुक व्यवस्थेवर ताण येतो. विशेषत: सणासुदीच्या काळात रेल्वे प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय वाढ होते. तिकीट न मिळाल्याने अनेकदा प्रवाशांची गैरसोय देखील होते. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेच्या वेस्टर्न विभागाने (पश्चिम रेल्वे) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वेस्टर्न रेल्वे चार विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवणार आहे.
नवरात्र आणि दिवाळी हे सण संपूर्ण भारतात साजरे केले जातात. तर, छठ पूजा हा मुख्यतः बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे. सणासुदीसाठी घरी जाणाऱ्यांची संख्या वाढते. परिणामी रेल्वेची वेटिंग लिस्टही वाढते. कारण, वेस्टर्न रेल्वेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये परप्रांतीयांची संख्या फार जास्त आहे. सणाच्या काळात हे लोक आपापल्या गावी जाण्यासाठी निघतात. सणाच्या काळात प्रवाशांची गैरसौय होऊ नये म्हणून वेस्टर्न रेल्वेने विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
वेस्टर्न रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी विशेष ट्रेनचे तपशील जाहीर केले आहेत. या तपशीलांनुसार काही गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबईतून आपापल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे.
खालील गाड्यांच्या विशेष फेऱ्या होणार
ट्रेन क्रमांक 09189 मुंबई सेंट्रल-कटिहार स्पेशल 27 डिसेंबरपर्यंत
advertisement
ट्रेन क्रमांक 09190 कटिहार-मुंबई सेंट्रल स्पेशल 30 डिसेंबरपर्यंत
ट्रेन क्रमांक 09049 दादर-भुसावळ स्पेशल 26 डिसेंबरपर्यंत
ट्रेन क्रमांक 09050 भुसावळ-दादर स्पेशल 26 डिसेंबरपर्यंत
ट्रेन क्रमांक 09051 दादर-भुसावळ स्पेशल 31 डिसेंबरपर्यंत
ट्रेन क्रमांक 09052 भुसावळ-दादर स्पेशल 31 डिसेंबरपर्यंत
ट्रेन क्रमांक 09057 उधना-मंगळुरू स्पेशल ३१ डिसेंबरपर्यंत
ट्रेन क्रमांक 09058 मंगळुरू-उधना स्पेशल 1 जानेवारी 2026 पर्यंत
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 30, 2025 1:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Western Railway: दसरा-दिवाळीत सहज करा प्रवास, वेस्टर्न रेल्वेचा मोठा निर्णय, कसं असेल वेळापत्रक?