याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वेगमर्यादेचं उल्लंघन, लेन कटिंग, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेट नसणे आणि इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर रडारचा वापर करून लक्ष ठेवलं जाणार आहे. या रडार प्रणालीद्वारे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना तत्काळ ई-चलान पाठवून दंडही ठोठावता येणार आहे.
advertisement
कशी असते रडार प्रणाली?
रडार यंत्रणा रेडिओ लहरींचा वापर करून एखादी वस्तू कुठे आहे? तिचा वेग किती आहे? यांचा शोध घेण्याचं काम करते. वाहनांचा वेग मोजण्यासाठी ही यंत्रणा काम करते. रहार लहरींचा वेग प्रकाशाच्या वेगाएवढा असतो. त्यामुळे ताशी 100, 150, 200 किंवा 300 किलोमीटर वेगाने जात असलेली वाहनं देखील रडार सहज पकडतं. रडार यंत्रणेमुळे वाहन चालकाने वाहतूक नियम मोडला की, काही सेकंदात चालकाला ई-चलान मिळणार आहे. वाहतूक पोलिसांच्या रडार गन 300 मीटर ते एक किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांचा वेग पकडू शकतात. त्यामुळे अर्धा किलोमीटरपर्यंतचं वाहन सहज रडारच्या टप्प्यात येतं.
तासाला 700 ते 800 ई-चलान
वाहतुकीचे नियम मोडल्यास, रडार यंत्रणेचे कॅमेरे लगेच वाहनांची नंबर प्ले स्कॅन करतात. तिची आरटीओ डेटाबेसशी पडताळणी होते. त्यानंतर सिस्टीम पुरावा प्रोसेस करते व ई वाहन चालकाच्या मोबाईल किंवा ई-मेलवर चलान पाठवले जाते. अशा प्रकारे एका तासाला सातशे ते आठशे ई चलान तयार होतात.
इंटरसेप्टर वाहनावर रडार सिस्टीम
'इंटरसेप्टर वाहन' हे विशेष पोलीस वाहन असते. महामार्गावर किंवा शहरातील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. यात कॅमेरे, रडारगन, स्पीड डिटेक्टर, ब्रेथ अॅनालायझर, वायरलेस सिस्टीम, अशी आधुनिक उपकरणे बसवलेली असतात. ठाणे जिल्ह्यात रडार यंत्रणेवरील वाहन अजून सुरू करण्यात आलेलं नाही. मात्र, लवकरच त्याचा वापर सुरू होईल, अशी माहिती आरटीओ विभागातील एका अधिकाऱ्याने दिली.