ग्रामीण भागातही सर्पदंशाची समस्या मोठ्या प्रमाणात आहे. येथे शेतीची कामे सुरू आहेत आणि पावसामुळे माळरानावर आणि शेतात गवत आणि झुडपे वाढले आहेत. यामुळे शेतकरी, तरुण आणि महिला शेताच्या रस्त्यांवरून किंवा गवतातून मार्ग काढताना सर्पदंशाची घटना घडत आहे.
धक्कादायक आकडेवारी आली समोर
उपजिल्हा रुग्णालयाच्या माहितीप्रमाणे भिवंडी शहरात जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत एकूण 254 सर्पदंशाच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत. यामध्ये जानेवारीत 22, फेब्रुवारीत 12, मार्चमध्ये 16, एप्रिलमध्ये 17, मेमध्ये 24, जूनमध्ये 50, जुलैमध्ये 55, ऑगस्टमध्ये 29 आणि सप्टेंबरमध्ये 22 अशी नोंद आहे. या सर्व रुग्णांवर इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले.
advertisement
रुग्णालयात सर्पदंशासाठी आवश्यक सर्व औषधे उपलब्ध आहेत. मात्र,जर एखाद्या रुग्णाला मोठ्या प्रमाणात विषबाधा झाली असेल किंवा रुग्णाला सतत व्हेंटिलेटरची गरज असेल तर त्याला ठाणे किंवा मुंबई येथील मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवले जाते. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मो. इजहार लाल मो. अन्सारी यांनी सांगितले की, सर्पदंश झाल्यास तणाव न घेता शांत राहणे आवश्यक आहे. रुग्णाला त्वरित वैद्यकीय मदत मिळणे खूप महत्वाचे आहे. लवकर औषधोपचार केल्यास रुग्णाचे जीव वाचू शकतो आणि गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.
'या' घटना टाळण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी?
सर्पदंशाची घटना टाळण्यासाठी काही खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. घराभोवती, शेतात किंवा रस्त्यांवर गवत कापून ठेवा. रात्री चालताना लांब बूट किंवा पायावर काहीतरी उंच ठेवणे उपयोगी ठरते. लहान मुले किंवा वयोवृद्ध लोक सतत लक्ष ठेवून चालावेत. जर कुणाला सर्पदंश झाला तर लगेच जवळच्या रुग्णालयात घेऊन जाणे हवे. तणाव किंवा घाबरून राहिल्याने विषाचा परिणाम वाढतो.
संपूर्ण भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील लोकांनी या काळात अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. सर्पदंशाचे प्रमाण कमी करणे आणि वेळेत उपचार मिळवणे हेच सुरक्षित राहण्याचा मार्ग आहे. या प्रकारे भिवंडीमध्ये सध्या सर्पदंश ही गंभीर समस्या बनली असून लोकांनी खबरदारी घेतल्यास ही घटना टाळता येऊ शकते.