उल्हासनगर (ठाणे) : प्रेस बझार म्हणजे ठाणे जिल्ह्यातील सर्वात स्वस्त व होलसेल असलेला एक फर्निचर बाजार. घरातील कपाट असो वा टेबल किंवा सोफा या ठिकाणी फर्निचर संबंधीचे ए टू झेड पर्याय अगदी स्वस्त दरात उपलब्ध आहे. ठाण्यातील उल्हासनगर भागात असलेल्या या बाजारातील सर्व दुकाने होलसेल असून त्यांच्या स्वतःची उत्पादन कंपनी आहे. जर तुम्हाला स्वतःचा फर्निचरचा किंवा सलूनचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हे ठिकाण नक्कीच एक उत्तम पर्याय ठरेल.
advertisement
त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचे स्वतःचे सलून किंवा पार्लर सुरू करायचे असेल तर, या फर्निचर मार्केटमध्ये एकमेव असे दुकान आहे, ज्याठिकाणी फक्त सलूनसाठी लागणारे फर्निचर तयार करून मिळते. प्रजापती सलून चेअर असे या होलसेल दुकानाचे नाव आहे. सलूनसाठी लागणाऱ्या युनिक चेअरचे भरपूर कलेक्शन या ठिकाणी [पाहायला मिळेल. फक्त चेअरच नव्हे तर बेसिन असलेले शाम्पूचेअर, हायड्रा फेशल मशीन, ट्रॉली, चेअर, स्टीमर, हेअर स्पा चेअर, पेडिक्यूर टब इत्यादी सामान एकाच छता खाली खरेदी दारांना खरेदी करता येईल.
piles health tips : ही आहेत मूळव्याध होण्याची प्रमुख कारणे, म्हणून आताच बदला या सवयी
या होलसेल दुकानाचे राजू प्रजापती यांच्याशी लोकल18 च्या टीमने संवाद साधला. यावेळी राजू प्रजापती यांनी सांगितले की, याठिकाणी सर्व प्रकारचे सलूनसाठी लागणारे फर्निचर हव्या त्या मॉडेलमध्ये कस्टमाइझ करून मिळेल. स्वतःचे मॅनुफॅक्चरिंग फॅक्टरी असल्यामुळे येथील किमती या रिटेलपेक्षा खूप कमी आहेत. रिटेलमध्ये 12-13 हजार रुपयांच्या मिळणाऱ्या शॅम्पू चेअर या ठिकाणी होलसेल किमतीत फक्त 6 हजार रुपयांत खरेदी करता येईल.