नुकतेच महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी सॅटिस प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी हा प्रकल्प गतीने पूर्ण करावा, तांत्रिक अडथळे लवकरात लवकर दूर करावेत, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. त्यामुळे हा प्रकल्प येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Mumbai One अॅपमुळे प्रवास झाला सोपा! जाणून घ्या हे अॅप कसे वापरायचे आणि काय सुविधा मिळतात
advertisement
कल्याण स्थानकालगत नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. याठिकाणच्या वाहतुकीत सुसूत्रता आणण्यासाठी सात वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने रेल्वे स्थानक वाहतूक प्रकल्प हाती घेतला होता. या प्रकल्पासाठी प्रस्तावित निधी 498 कोटी रुपयांचा असून शासनाचे सहाय्यही मिळाले. 2021 मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र, प्रकल्पाच्या भूसंपादन, रेल्वेच्या जागा, हॉटेलची बांधकामे हे विषय मार्गी लागण्यासाठी काम बंद ठेवावे लागले. त्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला.
दरम्यान, रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशांना एकाच ठिकाणी बस थांबा, रिक्षा वाहनतळ, दुचाकी, चारचाकी वाहनतळ, प्रवासी पादचारी मार्गिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. कल्याण शहराच्या बाहेरून येणारी वाहने ही रेल्वे स्थानक भागातील वाहतुकीला अडथळा ठरणार नाहीत, अशा पद्धतीने उड्डाणपुलावरून परस्पर जातील. त्यामुळे कल्याण स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी होईल.