महाराष्ट्रातील ही महापालिका काढून देणार फुकटात दात, निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Health Checkup: महाराष्ट्रात लोकांच्या आरोग्यासाठी विविध योजना सरकारकडून राबविल्या जातात. आता राज्यातील एक महापालिका मोफत दंत चिकित्सा सुविधा देणार आहे.
ठाणे: लोकांच्या आरोग्यासाठी सरकारकडून विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते. आता ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील टेंभी नाका येथील सी. आर. वाडिया या केंद्रात सुपरस्पेशालिटी दंत चिकित्सा विभाग सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी दोन दंत चिकित्सकांची नियुक्ती करण्यात आली असून दातांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून रुग्णांना मोफत उपचार देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
येत्या काही काळात ठाणे महापालिका निवडणुका होणार आहेत. ठाणेकरांना या निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच निवडणुकीच्या तोंडावरच ठाणेकरांना खास सुविधा मिळणार आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या माध्यमातून झोपडपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.
advertisement
या सुविधा मिळणार
रुग्णालयात दात स्वच्छ करणे, रुट कॅनल, दात काढणे, सिमेंट भरणे आदींसह इतर महत्त्वाच्या सुविधा मिळतील. पहिल्या टप्प्यात या सुविधा दिल्या जात असल्या तरी पुढील काळात दात इम्प्लांटसारख्या सुविधा देखील उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
निवडणुकीआधी आरोग्य सेवा
ठाणे महापालिकेच्या हद्दीत आयुष्यमान आरोग्य मंदिर टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. शहरातील काही प्रसूतिगृहांनी कात टाकली असून कळवा रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम केले जात आहे. अशातच आता ठाणेकरांच्या दातांच्या तपासण्या देखील मोफत होणार आहेत.
advertisement
सर्वसामान्यांना फायदा
खासगी रुग्णालयात गेल्यावर साधा दात काढण्यासाठी एक ते तीन हजारांचा खर्च येतो. तर रुट कॅनल आणि इतर उपचारांचा खर्च अनेकांच्या खिशाला न परवडणारा असतो. त्यात रुग्णालयात दाखल करावे लागत नसल्याने मेडिक्लेममध्ये देखील दातांवरील उपचारांचा खर्च मिळत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना ठाणे महापालिकेच्या या नव्या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 09, 2025 12:04 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
महाराष्ट्रातील ही महापालिका काढून देणार फुकटात दात, निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय!