वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ही वाहतूक योजना तयार करण्यात आली आहे. मुंबईकडून नाशिक आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांना आता नितीन कंपनी उड्डाण पुलावर चढण्याच्या सुरुवातीस असलेल्या दुभाजकाजवळून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांना आता स्लीप रोडने नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन मार्गे कापुरबावडीकडे वळवण्यात येईल.
advertisement
Mumbai Weather : वादळी वारे वाहणार, मुंबईला पाऊस झोडपणार, 24 तासांसाठी हवामान विभागाचा अलर्ट
ही वाहतूक योजना 16 मे ते 25 मे या कालावधीत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत अंमलात राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
May 17, 2025 9:29 AM IST






