या कालावधीत बारवी गुरुत्व वाहिनी क्र. 1, 2 व 3 वर दुरुस्तीचे आणि उन्नतीकरणाचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेअंतर्गत MIDC कडून पाणीपुरवठा होणाऱ्या विविध भागांमध्ये 24 तास पाणी उपलब्ध होणार नाही.
Soyabean Rate : शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, नवीन सोयाबीनचे दर घसरलेलेच, आज काय मिळाला भाव?
पाणीपुरवठा बंद राहणारे भाग पुढीलप्रमाणे आहेत
advertisement
दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता), कळवा प्रभाग समितीमधील सर्व क्षेत्रे तसेच वागळे प्रभाग समिती अंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्र. 2, नेहरूनगर आणि मानपाडा प्रभागातील कोलशेत खालचा गाव.
पाणीपुरवठा बंदी संपल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत पाण्याचा साठा करून ठेवावा आणि आवश्यक असल्यास पाणी अत्यंत काटकसरीने वापरण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने नागरिकांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले असून देखभाल-दुरुस्तीच्या कामानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरळीत करण्यात येईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.