ठाणे : आवड असेल तर व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरं जात आपली आवड जपू शकतो. ठाणे जिल्ह्यातील दिवा येथे राहणाऱ्या शोभा पोळ यांनीही हे सिद्ध करुन दाखवले आहे. शोभा पोळ यांना इयत्ता दहावीपासूनच वेगवेगळया प्रकारचे ब्लाऊज शिवण्याची, साडीचे कपडे, गोधड्या शिवण्याची आवड होती. पण तेव्हा मशीन वगैरे विकत घेण्याएवढी चांगली परिस्थिती नव्हती. नेमकं त्यांनी या परिस्थितीवर मात करत आज एका टेलरिंगचे दुकान कसे सुरू केले, हे जाणून घेऊयात.
advertisement
शोभा यांना मिळाली पतीची साथ
लग्नानंतरही अनेक वर्ष त्यांनी शाळेत मदतनीसाचे काम केले. घरगुती मणी वगैरे लावायचे कामही त्यांनी केले. परंतु त्या कोणत्याच कामात त्यांना आनंद मिळत नव्हता. अखेर ही गोष्ट शोभा यांचे पती सूर्यकांत यांच्या लक्षात आली आणि त्यांनी शोभा यांना साथ देत शोभा यांनी पुन्हा शिवणकाम करावं, यासाठी प्रोत्साहन दिले. यानंतर त्यांनी पुन्हा शिवणकाम करण्यास सुरुवात केली. आज मागील अनेक वर्षांपासून त्या शिवणकाम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी स्वतःच्या तीन शिलाई मशीन घेऊन एक दुकानाचा गाळासुद्धा विकत घेतला.
police bharati 2024 : धक्कादायक वास्तव! पोलीस भरतीसाठी इंजीनिअर, एमबीएच्या विद्यार्थ्यांनी केले अर्ज
काय आहे त्यांच्या दुकानाचे वैशिष्ट्य -
शोभा टेलर्स टेलरिंगच्या दुकानात आता त्या वेगवेगळ्या प्रकारच्या गोधड्या, ड्रेसेस शिवतात आणि गिऱ्हाईकांना आवडतील, अशा वेगवेगळ्या डिझाईन्सचे ब्लाउजही शिवून देतात. तुम्हाला हव्या त्या प्रकारच्या गोधड्या, इथे हाताने शिवून मिळतील. त्यामुळे त्यात मायेची उबसुद्धा असेल.
काय म्हणाल्या शोभा पोळ -
'मी पूर्वीपासूनच टेलरिंगचे काम करायचे. मात्र, मी कधी त्याकडे व्यवसाय म्हणून पाहिलं नाही. साधारण 10 वर्षांपूर्वी माझ्या मिस्टरांनी मला व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि शोभा टेलर्स खोलण्याचा विचार झाला. तिथूनच माझा प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला', असे शोभा टेलर्स हे दुकान सुरू करणाऱ्या शोभा पोळ यांनी सांगितले.
आधुनिक काळातील सावित्री, नवऱ्याला किडनी देत दिले जीवनदान, पती-पत्नीच्या प्रेमाची अनोखी गोष्ट!
शोभा यांना त्यांचे पती सूर्यकांत यांचा मिळणारा पाठिंबा पाहिल्यानंतर खंबीर जोडीदार असावा तर असा, हेच वाक्य मनात येतं. ज्यांच्या हातात काही नसतं पण आवडीचं काम करण्याची जिद्द आणि विश्वास असतो, त्यांच्यासाठी शोभा पोळ यांनी स्वतःच्या आवडीवर ठेवलेला विश्वास सर्वांसाठी प्रेरणा देणारा आहे.