याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवर लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका बनवण्याच्या प्रकल्पात जागेची समस्या निर्माण झाली आहे. जागेच्या कमतरतेमुळे सीएसएमटी ते परळ स्टेशन्सदरम्यान सहावी रेल्वे लाईन टाकणे शक्य नसल्याचं बोललं जात आहे. या भागात फक्त 5 रेल्वे लाईन टाकल्या जाणार असल्याचं रेल्वेतील अधिकाऱ्यांनी सांगितलं.
Local Ticket: फुकट्या लोकल प्रवाशांची होणार पंचाईत! क्यूआर कोड तिकीटविक्री बाबत रेल्वेचा मोठा निर्णय
advertisement
मध्य रेल्वेवर मेल एक्सप्रेसला प्राधान्य दिल्यास अनेकदा लोकल ट्रेन्स उशीराने धावतात. लोकल वेळेवर धावण्याच्या दृष्टीने 2025 मध्ये पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्या स्वतंत्र ट्रॅकवर चालवण्याचं उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून हा प्रकल्प मंजूर केला गेला होता. प्रकल्पांतर्गत सीएसएमटी ते परळदरम्यान सहा लाईन करण्याची योजना होती. पण, जागेचा अभाव आणि भूसंपादनात अडथळे आल्यामुळे सीएसएमटी ते परळदरम्यान फक्त पाचव्या रेल्वे लाईनचं बांधकाम शक्य होणार आहे.
दहा वर्षांपासून सुरू झालेला हा प्रकल्प अतिशय संथ गतीने सुरू आहे. या वर्षी एप्रिल महिन्यात कॅगने रेल्वे प्रशासनावर याबाबत टीका देखील केली होती. प्रकल्पासाठी जानेवारी 2024 पर्यंत 500.93 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, अजूनही रेल्वे लाईन टाकण्याचं काम पूर्ण झालेलं नाही.