10 रुपयांपासून 1500 रुपयांपर्यंत फेटे उपलब्ध
गणपती बाप्पाच्या 1 इंच ते 10 फूट उंचीच्या मूर्तींसाठी येथे फेटे उपलब्ध आहेत. फेट्यांची किंमत फक्त 10 रुपयांपासून सुरू होते. काही फेट्यांच्या किंमती 30, 50, 100 आणि 1500 रुपयांच्या रेंजमध्ये आहेत. विशेष म्हणजे ग्राहकांच्या आवडीनुसार खास डिझाईनचे फेटे येथे तयार करून दिले जातात.
Ganesh Chaturthi: गणपती बाप्पाची रोजची पूजा कशी करावी? शास्त्र, मंत्र आणि विधी संपूर्ण माहिती
advertisement
फेट्यांचे असंख्य प्रकार एकाच ठिकाणी
या दुकानात गणपती बाप्पासाठी विविध प्रकारचे फेटे उपलब्ध आहेत. पैठणी साडीच्या धाग्यांपासून बनवलेले पैठणी फेटे पारंपरिक आणि आकर्षक दिसतात. नऊवारी फेटा नऊवारी साडीच्या बांधणीसारखा असून मूर्तीला पारंपरिक लुक देतो. तसेच फुलांचे फेटे फुलांच्या डिझाईनवर आधारित असून सजावटीत वेगळेपणा आणतात. पुणेरी पगडी आणि पेशवाई पगडी या राजेशाही आणि पारंपरिक स्पर्श देणाऱ्या प्रकारचे फेटे देखील येथे आहेत. याशिवाय वेगवेगळ्या आकारांच्या मूर्तींसाठी रेडीमेड फेटे उपलब्ध आहेत. गणेशोत्सवाच्या सजावटीत बाप्पाच्या फेट्यांना वेगळं स्थान आहे. त्यामुळे या वर्षी तुमच्या बाप्पालाही आकर्षक फेट्याने सजवायचं असल्यास हे ठिकाण उत्तम पर्याय ठरू शकतं.