याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना मुंबईत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. त्यामुळे ही वाहतूक ठाणे-बेलापूर रोडवरने वळवण्यात आली आहे. परिणामी ठाणे-बेलापूर मार्गावर वाहनांची संख्या वाढली असून काही ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. याशिवाय, अनेक मराठा आंदोलकांनी रात्री पनवेल सारख्या ठिकाणी मुक्काम करून आज सकाळी पुन्हा लोकल आणि रस्ते मार्गे आझाद मैदान गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे देखील अनेक ठिकाणी वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत.
advertisement
Local Megablock: गणपती दर्शनासाठी बाहेर पडाल तर अडकाल! रेल्वे घेणार मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
31 ऑगस्ट (रविवार) रोजी गौरींचं आगमन होणार आहे. गौरी आवाहन रविवारी, पूजन सोमवारी आणि विसर्जन मंगळवारी आहे. शिवाय, शनिवार आणि रविवार विकेंडदेखील आहे. त्यामुळे आज पुन्हा अनेक लोक गावी जाण्यासाठी निघाले आहेत. मुंबई आणि उपनगरांमधून कोकण, पुणे, कोल्हापूरकडे जाणाऱ्या लोकांमुळे जास्त वाहतूक कोंडी होऊ शकते. एकूणच काय तर गौरी-गणपती, विकेंड आणि मराठा आरक्षण आंदोलन या तिहेरी संकटामुळे मुंबई आणि उपनरांमधील अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
दरम्यान, सायन-पनवेल मार्गावरील वाहतूक आज सुरळीत सुरू आहे. कालचा (29 ऑगस्ट) अनुभव बघता वाहतूक पोलिसांनी आज वाहतुकीचं व्यवस्थित नियोजन केलं आहे. ठिकठिकाणी पोलीस आणि वाहतूक पोलीस तैनात आहेत.