लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या ज्येष्ठ शिवसैनिक कक्षातून धुरा सांभाळण्यात आली होती.
येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा या जेष्ठ शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश दिले जाणार आहे. आगामी निवडणुकीत रणनीती याच ज्येष्ठांकडून आखली जाणार असून त्यासाठी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळाव्याचे आयोजन केले आहे. 20 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता शिवाजी मंदिर, दादरमध्ये मेळाव्याच आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यातून मार्गदर्शन करतानाच ८०० ज्येष्ठांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
advertisement
नव्या उमेदवारांना ज्येष्ठांचा आधार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून यंदाच्या महापालिका निवडणुकीत 70% नवे उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र या नव्या उमेदवारांसाठी आता जुने शिवसैनिक मैदानात उतरून काम करणार आहेत . लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ शिवसैनिकांनी पक्षासाठी कामं केली होती . आता पुन्हा प्रत्येक शाखा शाखांमध्ये आणि घरोघरी जाऊन अहवाल गोळा करणार आणि रणनीती आखणार आहेत.
1966 साली बाळासाहेब ठाकरे यांनी पक्ष स्थापन करताना ज्या शिवसैनिकांनी पक्षासाठी कामं केली, ते शिवसैनिक एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर पुन्हा सक्रिय होत कामाला सुरुवात केली होती . या शिवसैनिकांचा शिवसेना भवनच्या तळघरात 'ज्येष्ठ शिवसैनिक कक्ष' स्थापन करण्यात आला होता . या कक्षात 800 जेष्ठ शिवसैनिक काम करतायत .
ज्येष्ठांचा होणार सन्मान
ज्येष्ठ शिवसैनिकांनी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत केलेलं काम पक्षासाठी अमूल्य योगदान ठरलं . आगामी काळात देखील या शिवसैनिकांनी पक्षासाठी जोमाने काम करावं यासाठी या ज्येष्ठांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे ..
उद्धव ठाकरे करणार मार्गदर्शन
येत्या 20 नोव्हेंबर रोजी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात सायंकाळी ६ वाजता 'ज्येष्ठ शिवसैनिक कक्षा'चा दुसरा वर्धापन दिन आहे . यावेळी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्याच आयोजन करण्यात आलं आहे . आगामी निवडणुकीच्या दृष्टीने उद्धव ठाकरे ज्येष्ठांना मार्गदर्शन करून व्यूहरचना आखणार आहेत.
हे ही वाचा :
