जळगावमधून देखील उत्तरकाशीत पर्यटनासाठी 15 जण गेले होते. त्यांच्याशी मागच्या 50 तासांपासून कोणताही संपर्क होऊ शकला नव्हता. त्याच पर्यटकांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटी नंतर मोठा जलप्रलय आला होता. या जलप्रलयानंतर उत्तराखंड येथे पर्यटनासाठी गेलेले धरणगाव तालुक्यातील 15 यात्रेकरू बेपत्ता झाले होते.
विमानतळावर उतरला, संशयास्पद हालचालींवरून पोलिसांनी ओळखलं, बॅग चेक केली, चोरी उघडी पडली
advertisement
तब्बल 50 तासाहून अधिकचा काळ लोटला गेल्यानंतर ही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे संपूर्ण गावांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु मुलांसोबत गेलेल्या वाहन चालकाने घरी फोन करून सर्व तरुण सुरक्षित आणि सुखरूप असल्याचे सांगितल्यानंतर सर्व मुलांच्या पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सर्व तरुण गंगोत्री पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या सैन्यदिलाच्या त्यामध्ये असून रस्ता सुरू झाल्यानंतर दोन ते तीन दिवसात सर्व करून घरी परततील असे सांगितले आहे.
दुसरीकडे पाळधी ग्रामस्थांनी आज सकाळपासूनच मुलं सुखरूप परत यावे, यासाठी देवाला साकडे घातले होते. त्यानंतर थोड्याच वेळात सर्व मुलं सुखरूप असल्याचा निरोप आल्यानंतर पालकांच्या डोळ्यात आनंदश्रूत तरळले. आमची मुलं सुखरूप असल्याचा निरोप मिळाला असला तरी त्यांच्याशी आमचे एकदा बोलले झाल्यानंतरच आम्हाला समाधान मिळेल, अशा प्रतिक्रिया नातेवाईकांनी दिल्या आहेत.