फुल टाईम ड्युटी, पार्ट टाईम गरबा
नवरात्री उत्सवासाठी महिला वर्ग सज्ज आहे. अनेक महिला सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नोकरी करतात. घरचे काम, स्वयंपाक, मुलांचा अभ्यास या व्यस्ततेतून वेळात वेळ काढतात आणि गरबाच्या कार्यक्रमाची तयारी करतात. काही महिला आपल्या चिमुकल्या मुलांनाही सोबत घेऊन गरब्याच्या सरावात किंवा तयारीत खंड पडणार नाही याकडे लक्ष देत आहेत. तर काही घरच्या अडचणींतून वेळ काढून छंद जोपासत आहेत. अर्थात त्यांचा फुल टाईम नोकरी आणि पार्ट टाईम गरबा सुरू आहे.
advertisement
आंधळ्याच्या डोळ्यात घातला बिबा..., संत सखूआईची अंगावर काटा आणणारी आख्यायिका, Video
मुलगा दवाखान्यात पण वेळ काढते
"मी नोकरी करते. 10 ते 5 चा नोकरीचा वेळ आहे.त्यातून वेळ काढून यावर्षी गरबा करण्याचा ध्यास मी घेतलाय.घरी माझ्या मुलाला डेंग्यू झाला आहे. तो दवाखान्यात ऍडमिट आहे. अशावेळी त्याच्या जवळ पतीला ठेवून मी गरबा खेळण्यासाठी वेळ काढत आहे." असं शुभांगी चौधरी सांगतात. तर ज्योती शिरसोदे म्हणतात की, "मी राष्ट्रभाषा प्रचार समितीला नोकरी करते. 10 ते 5 चा वेळ आहे. नोकरी करून गरबाला येते. परत घरी जाऊन घरचे काम आणि स्वयंपाक करावा लागतो. सगळं आवडीमुळे मॅनेज करते."
स्वत:साठी थोडा वेळ काढावा
"मी डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून नोकरी करते. आपली नोकरी आणि घर या सर्व व्यस्ततेतून थोडा वेळ काढणे कठीण जाते. पण आपल्या आवडीनिवडी आणि हौस आपण सोडू शकत नाही. म्हणून माझ्या नोकरीच्या फ्री टाईम मधून जसा मला दोन-तीन तासांचा वेळ मिळतो मी त्या वेळेमध्ये गरब्याची प्रॅक्टिस करते. इतर महिलांना मी सांगेल की तुम्हीही आपलं बिझी शेड्युल मधून थोडा वेळ स्वतःसाठी काढणं महत्त्वाचं आहे," असं हर्षा वाघ सांगतात.
नवरात्रीत घटस्थापनेचा मुहूर्त कोणता? जगदंबा प्रसन्न होण्यासाठी ही चूक टाळा
ग्रामीण भागातही दांडियाची क्रेझ
दरवर्षी गरबा, दांडियात नवनवीन प्रकार आणण्यााच प्रयत्न असतो. त्यातील लेटेस्ट स्टेप्स नृत्य प्रशिक्षक तरुणाईला शिकवत असतात. वर्धा शहराच्या अनेक भागात तरुणाई गरब्याच्या शिबिरांमध्ये ठेका धरताना दिसत आहे. तर यंदा ग्रामीण भागातही दांडिया गरबाची क्रेज वाढली आहे. मंदिर परिसरातच महिला, युवतींसह लहान मुली दांडिया गरबाचा सराव करताना दिसत आहेत. तर अनेक नोकरदार महिला नोकरी आणि घर सांभाळून थोडा वेळ आपल्यासाठी काढत आहेत. आपल्या आवडीनिवडी आणि छंद जोपासत आहेत. त्यामुळे सध्या 'महिलांचा फुल टाईम ड्युटी, पार्ट टाईम गरबा' सुरू आहे.





