वर्धा : वर्धा नजीक असलेल्या दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या कुष्ठधाम आश्रमातील जुन्या काळातील गोसेवेला नव्या अर्थाने चालना मिळणार आहे. कारण याच गाईंच्या शेणापासून शोभेच्या वस्तू तयार करून विक्री केल्या जात असून मिळालेला पैसा गोशाळेच्या विकासासाठी कामात आणल्या जाणार आहे. खरंतर आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काही गाई विकण्याचा विचार समितीचा होता. मात्र ताराताईंनी दिलेला विश्वास समितीला मदतीचा ठरणार आहे.
advertisement
ताराताईंचा गोसेवेचा ध्यास
मूळच्या ओडिशा राज्यातील असलेल्या ताराकांतीताई पटेल यांनी गोसेवेचा ध्यास घेतलाय. त्यामुळे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या काळात सुरू झालेल्या वर्ध्याच्या दत्तपूर येथील महारोगी सेवा समीतीच्या कुष्ठरोगी आश्रमातील गोशाळाला आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी ताराकांतीताईंनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केलाय. याठिकाणी गाईंच्या शेणापासून कुंड्या आणि आकर्षक वस्तू बनवून विक्री केल्या जात आहेत. कुंड्या, छोटे रोपटे आणि बीजांकुरण्यासाठी लहान कुंडी, दिवे, मुलांच्या खेळण्याच्या वस्तू, शोभेच्या वस्तू, बसण्यासाठी पाट, भिंतीवर लावण्यासाठी शोभेची वस्तू, तसेच लहान मुलांच्या अभ्यासात कामी येणाऱ्या काही वस्तू ताराताईंनी बनवल्या आहेत.
जय बजरंगबली! कोल्हापूरकरांची अनोखी हनुमान भक्ती, थेट डोक्यावर साकारले मारुती, Video
ताराताईंनी दिला विश्वास
ताराताई जेव्हा आश्रमात आल्या तेव्हा त्याला भरपूर मोठी जागा आणि गोशाळा दिसली मात्र याठिकानी विकास किंवा स्वच्छता, नीटनेटकेपणा दिसली नाही. त्यामुळे त्यांना विचार आला की याठिकाणी जागेचा योग्य तो उपयोग झाला पाहिजे. काहीतरी नवीन करण्याचा विचार त्यांनी केला. त्यानंतर महारोगी सेवा समितीचे सचिव चित्तरंजनदास सारंगी यांनी तराताईंना गोशाला आणि बिकट आर्थिक परिस्थिती बद्दल कळवलं. तेव्हा ताराताईंनी आश्रमातील गाईंकरिता आणि गाय आपल्याला कशाप्रकारे पैसे मिळवून देऊ शकते हे दाखवून देण्यासाठी या शोभेच्या वस्तू बनवने आणि इतरांना शिकविणे सुरू केलं.
आश्रम परिसरात सुरू आहे रंगरंगोटी काम
कुष्ठरोगी आश्रमातील एका ठिकाणी या वस्तू बनविण्याचं काम सुरू आहे. सध्या विक्रीसाठी मोठा स्टॉक बनणे, रंगरंगोटी करणे सुरू असून आश्रमात या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या वस्तू ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हॉट्सअपग्रुपच्या माध्यमातून माहिती देणे, तसेच भेटी देणाऱ्या लोकांना फायदे समजून सांगणे या माध्यमातून लोकांना कळेल आणि ऑर्डर्स येतील. तसेच ऑर्डर घेताना 25 टक्के पैसे आम्हाला आधी द्यावे लागतील आणि डिलिव्हरीनंतर पूर्ण पैसे देणे असे नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं.
पुणेकर हुश्शार! 50व्या वर्षी शिक्षण, सुरू केला मसाल्यांचा व्यवसाय, आज जगभरात नाव
ताराताईंची स्वकल्पना
गाईच्या शेणापासून विविध आकर्षक वस्तू बनवण्याची संकल्पना ही तारा यांची असून त्यांनी कुठेही यासंदर्भात आधी प्रशिक्षण घेतले नाही. त्यांच्या या कलेला जगभर पसरवण्याची इच्छा असून त्या भारतात वेगवेगळ्या गावात जाऊन लोकांना या संदर्भात माहिती देत प्रशिक्षण देत असल्याचे त्यांनी सांगितलं. तर अशाप्रकारे गांधींजींच्या काळातील, ऐतिहासिक कुष्ठरोगी आश्रमातील गाई आर्थिक परिस्थितीमुळे विक्री होऊ नये त्यामुळे गाईच्याच शेणापासून गोशाळाला आर्थिक मजबूत करण्यासाठी ताराकांती ताईंचेपर्यंत प्रेरणादायी आहेत.