सकाळी वर्धा रेल्वे स्थानकावर नेमकं काय घडलं?
वर्धा रेल्वे स्थानकावर पुणे- नागपूर एक्सप्रेस सकाळी आठ वाजता आली. काही वेळातच रेल्वेगाडी स्थानकावरुन सुटली असता चेन पुलींग झाल्याने रेल्वेगाडी पुन्हा स्थानकावर थांबविण्यात आली. कोच नंबर S/1 ला अटेंड केल्यावर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वेची पाहणी केली असता सीट क्रमांक 7-8 वरील रत्ना दयाल यादव (30) रा. पारडी, नागपूर यांना प्रसुती कळा आल्याचे दिसले.
advertisement
12 वर्षांची चिमुरडी सातासमुद्रापार उंचावणार जालनाची मान
त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक आर. एस.मिना यांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्यांना बोलावून तातडीने स्टेशन मास्टर यांना रेल्वे थांबविण्याच्या सूचना केल्या आणि रेल्वे डॉक्टरांना टीम आणि स्ट्रेचर सह बोलावून घेतलं. आणि रेल्वे तच दयाल यादव यांची प्रसूती झाली. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळ सुदृढ असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले.
ट्राम ते एसी BEST बस, 150 वर्षांचा इतिहास उलगडणाऱ्या 'या' संग्रहालयाला एकदा तरी भेट द्यायला हवी
अधिकाऱ्यांचे सतर्कता आणि बाळाचा सुखरुप जन्म
या घटनेदरम्यान निरीक्षक आर.एस. मीना यांच्या मार्गदर्शनात एस. के कनोजिया, मिश्रा, घोडेकर यांनी देखील सतर्कता बाळगली. रेल्वेगाडीत महिलेची सुरक्षित प्रसुती केल्यानंतर रेल्वे रुग्णालयातील परिचारिका पूजा भगत, स्वाती वासनिक यांनी प्रसुत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क केला. प्रसुत महिलेला आणि नवजात शिशुला जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षितरित्या उपचारार्थ दाखल केले आहे.






