काय सांगतात दर्शचे वडील?
मी सन 2018 मध्ये यवतमाळ ते मुंबई असा सायकलने प्रवास केला होता. कारण नोव्हेंबर 2005 नंतर जे काही कर्मचारी नियुक्त झाले होते त्यांचे आणि जे कर्मचारी मृत झाले होते. त्यांच्या कुटुंबाचे हाल एकदम वाईट असल्यामुळे आम्ही पेन्शनच्या मागणी करिता यवतमाळ ते मुंबई सायकलने गेलो होतो. आणि त्या अनुषंगाने आजपर्यंत गेल्या 8-10 वर्षापासून जो काही जुन्या पेन्शनसाठी लढा देत आहोत. यामध्ये मृत कर्मचारी कुटुंबाला न्याय दिलेला आहे त्यांना फॅमिली पेन्शन आणि ग्रॅज्युटी लागू झालेली आहे. सर्व 8-10 वर्षांच्या लढ्यामुळे झालंय. यंदा नागपुरात मोर्चात अनुषंगाने किमान पाच लाखाच्या वर कर्मचारी या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. आम्हाला शासनाची भीक नको हक्काची संवैधानिक पेन्शन पाहीजे. त्यासाठी नागपुरात जात असल्याची माहिती प्रवीण बहादे यांनी दिली.
advertisement
सलाम या गुरुजींना, गावखेड्यात खेळाडू घडवण्यासाठी केलं मोठं काम, Video
माझ्या मुलांनी मला सांगितलं की पप्पा तुम्ही एवढे दिवस झाले की जुन्या पेन्शनसाठी लढा देत आहात. यवतमाळ ते मुंबई जसे सायकलने गेला होता. मलाही तसं एक दिवस स्केटिंगने जायचं आहे. त्याने सुद्धा एक तयारी दर्शवली आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण आमचे कुटुंब आम्ही सर्व तयार झालो, असेही त्यांनी बोलताना सांगितले.
याला म्हणतात जिद्द! नातवंडांसह आजी शिकतेय इयत्ता पहिलीत, बाराखडीपासून सुरुवात
2005 नंतर नियुक्त राज्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. या एकमेव मागणीसाठी जुनी पेन्शन संघटना आणि कर्मचारी समन्वय समितीच्या नेतृत्वात 12 डिसेंबर 2023 रोजी राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय खाजगी अनुदानीत कर्मचारी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर पेन्शन जन क्रांती संघटनेचा मोर्चा निघणार आहे. त्या आंदोलणात सहभागी होण्यासाठी अवघ्या नवव्या वर्गात शिकणाऱ्या दर्शचं योगदान लक्ष वेधून घेणारं ठरतंय.