TRENDING:

मनोरुग्णांनी तयार केला पळसाच्या फुलांचा रंग; अनोख्या पद्धतीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश Video

Last Updated:

विशेष म्हणजे स्वतः मनोरुग्ण या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. मनोरुग्ण स्वतः पळसाची फुले तोडून आणून त्यावर रंग बनविण्याची प्रक्रिया करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमिता शिंदे, प्रतिनिधी 
advertisement

यवतमाळ : होळीच्या सणाला मोठ्या प्रमाणात रंगांची उधळण केल्या जाते. मात्र, हे रंग नैसर्गिक नाहीतर केमिकल युक्त असल्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मनोरुग्णांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या यवतमाळ येथील नंददीप फाऊंडेशनने पळसाच्या फुलांपासून रंग बनविण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. विशेष म्हणजे स्वतः मनोरुग्ण या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले आहेत. मनोरुग्ण स्वतः पळसाची फुले तोडून आणून त्यावर रंग बनविण्याची प्रक्रिया करत आहेत. आणि कचऱ्यातून प्लास्टिक बॉटल्स उचलून आणून त्यातच रंग भरून विक्री केला जाणार असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आहेत.

advertisement

असा तयार झाला रंग 

सर्वप्रथम मनोरुग्णांनी जंगलात जाऊन पळसाची फुले तोडून आणली. त्यांच्या सोबतिला अनेकजण होते. त्यानंतर फुले साफ स्वच्छ केली. देठ वेगळे केले आणि त्या फुलांना मोठ्या भांड्यात गरम पाण्यात उकळून थंड केल्यानंतर रंग काढून घेतला. त्याची पेस्ट केली आणि गाळून घेतला. अशाप्रकारे रंग तयार केला.

मुलांना शिकवायचं होतं, लाज न बाळगता 'ती' रस्त्यावर उतरली! आज जगतेय अभिमानाने

advertisement

प्लास्टिकचा केला पुनर्वापर 

काहीच दिवसापूर्वी यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा पार पडला. या दरम्यान मोठ्या प्रमाणात पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स वापरण्यात आल्या आणि त्या कचऱ्यात जाणार होत्या,मोठा कचरा तयार झाला असता. त्यापेक्षा मनोरुग्णांनी याच बॉटल्स जमा करून बॉटलमध्ये रंग भरला आणि या बॉटल्स संस्थेच्या वतीने विक्री केल्या जाणार असून वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल्स लावण्यात येणार आहे. या विक्रीतून येणाऱ्या पैशातून संस्थेला मदत होणार आहे.

advertisement

शेतकरी कुटुंबातील परिस्थिती दाखवणारा तेरवं चित्रपट; दिग्दर्शकाने मांडल्या व्यथा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

गडद केशरी रंगाचे आकर्षक दिसणारे पळसाची फुलं सर्वांचं मन प्रसन्न करीत आहेत. त्वचेचे नुकसान होऊ नाही आणि फुलांपासून रंग बनवण्याची परंपरा जपली जावी तसेच प्लास्टिकचा पुनर्वापर करून पर्यावरणाचे रक्षण व्हावं, असा संदेश नंददीप फाऊंडेशच्या वतीने दिला जात आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
मनोरुग्णांनी तयार केला पळसाच्या फुलांचा रंग; अनोख्या पद्धतीने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल