TRENDING:

IT कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त उत्पन्न गुलाबाच्या शेतीतून घेणारा तरुण; कशी साधली किमया? Video

Last Updated:

साताऱ्यातील शुभम जाधव या युवा तरुणाने 30 गुंठे क्षेत्रामध्ये बोर्ड एक्स गुलाबाची लागवड केली आहे. यामध्ये तो आयटी कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगारा पेक्षा जास्त उत्पन्न गुलाबाच्या शेतीतून कमवत आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
शुभम बोडके, प्रतिनिधी
advertisement

सातारा : जागतिक बाजारपेठेमध्ये गुलाबाला मोठी मागणी असते. 12 महिने मागणी असणारे फुल म्हणजे गुलाब. प्रेमाचे मैत्रीचे आणि शांततेचे प्रतीक म्हणजे गुलाब. लग्नकार्य असो किंवा कोणतेही सभा कार्यक्रम वाढदिवस अशा अनेक ठिकाणी गुलाबाच्या पुष्पाचे अधिक महत्त्व आहे. फेब्रुवारी महिना म्हटला तर गुलाबाला मोठा उच्चांक असा बाजार भाव मिळतो. गुलकंद, गुलाबजल, अत्तर यासाठी देखील गुलाबाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यामुळे साताऱ्यातील शुभम जाधव या युवा तरुणाने 30 गुंठे क्षेत्रामध्ये बोर्ड एक्स गुलाबाची लागवड केली आहे. यामध्ये तो आयटी कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगारा पेक्षा जास्त उत्पन्न गुलाबाच्या शेतीतून कमवत आहे.

advertisement

कशी साधली किमया?

शुभम विजय जाधव हा साताऱ्यातील सासुर्वे या गावातील आहे. त्याने गुलाबाची लागवड फेब्रुवारी 2023 मध्ये केली होती. आता प्रत्येक दिवशी 18 ते 20 किलो गुलाबाची तोडणी करून रहिमतपूर,सातारा,कोरेगाव या ठिकाणी मार्केटमध्ये स्वतः जाऊन विकत आहे. गुलाब शेतीमधून रोजच्या रोज पैसा मिळतो. त्यामुळे शुभमचे जीवन गुलाबाच्या फुला प्रमाणे फुलले आहे.

advertisement

घरच्यांचा विरोध पत्करुन केली रेशीम शेती, महिन्याकाठी आता 4 लाखांचे उत्पन्न, Video

गुलाबाच्या फुलाला किलोला 150 रुपये भाव मिळत असल्याने एका महिन्याला 60 ते 70 हजार रुपये एवढा नफा शुभमला मिळतो आहे. एका आयटी कंपनीमध्ये उच्चशिक्षित तरुणाला पण एवढा पगार मिळत नाही तेवढे उत्पन्न 12 शिक्षण झालेला शुभम जाधव त्याच्या 30 गुंठे क्षेत्रामधून उत्पन्न घेत आहे. त्याला वार्षिक सरासरी गुलाबाच्या शेतीतून 6 ते 7 लाख रुपये एवढा निव्वळ नफा मिळत आहे.

advertisement

गरिबांसाठी चालतं फिरतं ATM, 6 लाखांचा नफा, तुम्हालाही होऊ शकतो मोठा फायदा?

गुलाब लागवड करताना खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन,रोपांची तळ हाताच्या फोडाप्रमाणे देखभाल,कीड आणि रोगाचे नियंत्रण,गुलाबाची छाटणी,शेतातील भांगलन,या सर्व देखभालीनंतर महिन्याला 60 ते 70 हजार रुपये एवढे उत्पन्न गुलाबातून घेता येते. यामधून वर्षाला 6 ते 7 लाख रुपये निवळ नफा मिळवू शकता, असं शुभम जाधव याने  सांगितलं आहे.

advertisement

कापड दुकान बंद पडलं म्हणून कोंबड्या पाळल्या, आता महिन्याला होतेय लाखोंची कमाई

 युवा वर्गाला कानमंत्र

युवा पिढीने देखील शेती केली पाहिजे, शेतीकडे शेती म्हणून न पाहता एक व्यवसाय म्हणून युवा वर्गाने पाहिलं पाहिजे. दुसरीकडे कामाला जाण्यापेक्षा स्वतः शेती करून लाखों रुपये कमवता येतात, असंही देखील शुभम जाधव याने सांगितलं आहे.

मराठी बातम्या/मनी/कृषी/
IT कंपनीमध्ये मिळणाऱ्या पगारापेक्षा जास्त उत्पन्न गुलाबाच्या शेतीतून घेणारा तरुण; कशी साधली किमया? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल