मुंबई: सोन्याच्या किमतींमध्ये वाढीचा कल सतत सुरूच आहे आणि आता बँक ऑफ अमेरिका (Bank of America - BofA) ने सोन्याबाबत एक ऐतिहासिक अंदाज वर्तवला आहे. बँकेने सोने प्रति औंस (troy ounce) याचा टार्गेट वाढवून तब्बल 5,000 डॉलर्स ठरवला आहे. बँकेचा दावा आहे की- गुंतवणूकदारांचा वाढता कल आणि बाजारातील अस्थिरता यामुळे सोन्याच्या किमती पुढच्या वर्षी नवी उंची गाठतील.
advertisement
पुढच्या वर्षी भारतात सोनं 1.5 लाखांवर?
BofA च्या अंदाजानुसार जर सोन्याची आंतरराष्ट्रीय किंमत 5,000 डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचली आणि डॉलरचा दर 88 रुपयांवर स्थिर राहिला; तर भारतामध्ये सोन्याची किंमत सुमारे 15,000 रुपये प्रति ग्रॅम म्हणजेच 1.5 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी जाऊ शकते.
याचा साधा हिशोब असा
BofA टार्गेट: $5,000 प्रति औंस
1 troy ounce = 31.1035 ग्रॅम
डॉलर रुपयांत बदल: 5,000 × 88 = 4,40,000 प्रति औंस
त्याला ग्रॅममध्ये बदलल्यास: 4,40,000 ÷ 31.1035 = 14,144 प्रति ग्रॅम
म्हणजेच जर हा अंदाज खरा ठरला तर भारतात सोन्याची किंमत पुढच्या वर्षी दीड लाखांच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे.
BofA चा अंदाज आणि चांदीवरील लक्ष्य
बँक ऑफ अमेरिकाने आपल्या अहवालात नमूद केले आहे की 2026 पर्यंत गुंतवणुकीच्या मागणीत सुमारे 14 टक्क्यांनी वाढ होईल आणि यामुळे सोन्याची किंमत 5,000 डॉलर्स प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते.
हा अंदाज सध्याच्या जागतिक गुंतवणूक ट्रेंड्सच्या आधारावर करण्यात आला आहे.
याशिवाय बँकेने चांदीच्या किमतींचं लक्ष्यही वाढवलं असून ते आता 65 डॉलर्स प्रति औंस इतकं ठरवलं आहे.
ETF मध्ये विक्रमी गुंतवणूक
सोन्याबरोबरच गुंतवणूकदारांनी Exchange Traded Funds (ETFs) मध्येही प्रचंड गुंतवणूक केली आहे.
रिपोर्टनुसार सप्टेंबर महिन्यात ETF इनफ्लोमध्ये तब्बल 880% वाढ नोंदवली गेली आहे. जी 14 अब्ज डॉलर्सच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
सध्या जागतिक पातळीवर फिजिकल आणि पेपर गोल्ड होल्डिंग्ज मिळून एकूण इक्विटी आणि फिक्स्ड इनकम मार्केट व्हॅल्यूच्या 5% पेक्षा अधिक आहेत. हे मागील वर्षांच्या तुलनेत जवळपास दुप्पट आहे.
अल्पकालीन स्थैर्य, दीर्घकालीन तेजी
जरी सोन्याच्या किमतींमध्ये हा वेग पाहून गुंतवणूकदार उत्साहित असले तरी BofA ने एक इशारा दिला आहे की, एवढ्या वेगाने झालेल्या वाढीनंतर बाजार काही काळ स्थिर राहू शकतो. बँकेच्या मते- सध्याच्या वित्तीय आणि चलनविषयक धोरणांमुळे (financial & monetary policies) या बुल रनला मजबूत आधार मिळत आहे. म्हणजेच अल्पकालीन काळात किंमती स्थिर राहू शकतात; पण दीर्घकाळात सोन्याचे भाव ऐतिहासिक उंची गाठू शकतात.