TRENDING:

Diwali Safai Dhamaka 2025 : दिवाळी, साफसफाई आणि सेट-टॉप बॉक्स; देसी आईला सापडली अशी गोष्ट की, आता पश्चातापाची आली वेळ

Last Updated:

एका घरात ही दिवाळी सफाई दरम्यान एका महिलेला धक्कादायक गोष्ट सापडली जी तिच्या आयुष्यात तिला नेहमी लक्षात राहिल.

advertisement
मुंबई : दिवाळीची चाहूल लागताच भारतातील घरांमध्ये स्वच्छतेला सुरुवात होते. जवळ-जवळ सगळ्याच घरातील लोक साफसफाईला लागलतात. अशावेळी खोलीतला प्रत्येक कानाकोपरा साफ केला जातो. जुने कपाट आणि वस्तू तपासल्या जातात, आणि अनेकदा ह्या सफाई दरम्यान काही अशा वस्तू मिळतात ज्यांना आपण अनेक दिवसांपासून शोधत असतो किंवा त्यांना आपण विसरुन गेलेलो असतो. अनेकांना असा खजाना कधीना कधी नक्कीच मिळतो.
News18
News18
advertisement

अशाच एका घरात ही दिवाळी सफाई दरम्यान एका महिलेला धक्कादायक गोष्ट सापडली जी तिच्या आयुष्यात तिला नेहमी लक्षात राहिल.

Reddit वर एका युजरने सांगितले की त्याच्या आईला जुने DTH सेट-टॉप बॉक्स स्वच्छ करत असताना त्यामध्ये ₹2000 रुपयांच्या काही नोटा सापडल्या हे पैसे जवळजवळ 2 लाख रुपये होते.

युजरने त्यांचा अनुभव शेअर करताना फोटो पोस्ट करत “Biggest Diwali Safai of 2025” असं कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिले, “दिवाळी सफाई करताना माझ्या आईला जुना DTH बॉक्स उघडल्यावर ₹2 लाख सापडले, हे सर्व जुने 2000-रुपयांच्या नोटा होतया… कदाचित ह्या नोटा माझ्या देशी वडिलांनी नोटाबंदीच्या काळात लपवून ठेवलेल्या असाव्यात. आम्ही त्यांना अजून काही सांगितलेले नाही. कृपया सांगा आता याचं पुढे काय करता येईल?” पोस्टमध्ये त्या जुना नोटांचा नीट वेगवेगळ्या स्टॅक्समध्ये दाखवलेला फोटो देखील जोडला होता.

advertisement

₹2,000 नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023 मध्ये अधिकृतपणे चलनातून काढल्या होत्या, परंतु त्यांना ठराविक वेळेत डिपॉझिट किंवा बदलण्याची परवानगी होती. आता 2025 सुरु आहे आणि त्या नोटा बदलण्याची वेळ देखील निघून गेली आहे. त्यामुळे आता हे 2 लाख रुपये पाण्यात गेले असंच म्हणावं लागले.

Biggest diwali Safai of 2025

advertisement

byu/Rahul_Kumar82 inindiasocial

ही पोस्ट Reddit वर लवकरच चर्चेत आली, 4,000 पेक्षा जास्त अपवोट्स आणि शेकडो कमेंट्स आले आहेत. युजर्सनी ह्या घटनेवर आनंद, आश्चर्य आणि विनोद यांचा संगम व्यक्त केला.

एका युजरने लिहिले, “देशी वडिलांची क्लासिक शैली, नोटा एखाद्या इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये लपवून ठेवणे आणि नंतर विसरणे.” तर दुसऱ्या युजरने मजेशीरपणे टिप्पणी केली, “त्यांना सांगा तुम्ही नोटा ‘एक्सचेंज’ करून ठेवायला हव्या होत्या.”

advertisement

तिसऱ्या युजरने सुचवले, “अजूनही RBI कार्यालयात नोटा बदलण्याचा प्रयत्न करू शकता, तशी वेळ निघून गेली आहे, पण तरी प्रयत्न करायला काय हरकत आहे...” तर एकाने मजेशीरपणे लिहिले, “वडिलांना लक्षात येईल तेव्हा त्यांचा चेहरा पाहण्यासारखा असेल की त्यांनी ₹2 लाख DTH बॉक्समध्ये विसरले होते.”

काही युजर्सनी स्वतःच्या अनुभवही शेअर केले. एकाने सांगितले, “माझ्या आईला एकदा जुन्या साडीच्या कपाटातून 10,000 रुपये सापडले. दिवाळीची जादू नेहमीच अशा प्रकारे काहीतरी वेगळं शोधून आणते.”

advertisement

मराठी बातम्या/मनी/
Diwali Safai Dhamaka 2025 : दिवाळी, साफसफाई आणि सेट-टॉप बॉक्स; देसी आईला सापडली अशी गोष्ट की, आता पश्चातापाची आली वेळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल