TRENDING:

Unique Stall: तुम्ही कधी 18 व्या शतकातील नोटा आणि नाणी पाहिली का? मुंबईत उभारलाय खास स्टॉल

Last Updated:

ऐतिहासिक वारशाची जपणूक करणाऱ्या या स्टॉलमध्ये शिवराई होन पासून ते 18 व्या-19 व्या शतकांतील दुर्मीळ नाणी उपलब्ध आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CST) परिसरातील आग्रा बिल्डिंगजवळ एक अनोखा स्टॉल उभारण्यात आला आहे, जिथे जुनी नाणी आणि नोटांची विक्री आणि खरेदी केली जाते. ऐतिहासिक वारशाची जपणूक करणाऱ्या या स्टॉलमध्ये शिवराई होन पासून ते 18 व्या-19 व्या शतकांतील दुर्मीळ नाणी उपलब्ध आहेत. तसेच, विविध देशांतील नाणी आणि नोटांचा समावेशही येथे पाहायला मिळतो.
advertisement

या स्टॉलमध्ये इंडोनेशिया, कुवेत, झांबिया, नेपाळ, दुबई, फिलिपिन्स यांसारख्या देशांमधील चलनही विक्रीसाठी उपलब्ध आहे. हे स्टॉल केवळ विक्रीपुरते मर्यादित नसून नागरिकांना आपल्याकडे असलेली जुनी नाणी आणि नोटा विकण्याचीही संधी येथे दिली जाते. विक्री केलेल्या नाण्यांच्या आणि नोटांच्या बदल्यात रोख रक्कमही देण्यात येते.

Ganesh Visarjan 2025: बळीराजाला अनोखी मानवंदना, विसर्जन मिरवणुकीत कृषी साहित्यापासून साकारला बाप्पा, VIDEO

advertisement

विशेष म्हणजे येथे उपलब्ध असलेली नाणी आणि नोटा केवळ दुर्मीळच नाहीत तर सर्वसामान्य खरेदीदारांसाठी सुलभ दरात उपलब्ध आहेत. 50 रुपयांपासून सुरू होणारे दर हे 2000 रुपयांपर्यंत जातात त्यामुळे इतिहास आणि नाणे संकलनाचा छंद असणाऱ्या सर्व वयोगटातील लोकांसाठी हे स्टॉल एक आदर्श ठिकाण ठरते.

या स्टॉलची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे ग्राहक ऑनलाईन माध्यमातूनही नाणी आणि नोटा मागवू शकतात. इच्छुकांनी 9004566226 या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून नाणी आणि नोटांची माहिती मिळवू शकते.

advertisement

इतिहासप्रेमी, नाणे संकलक, तसेच दुर्मीळ गोष्टींच्या शौकिनांसाठी हा स्टॉल एक खजिनाच ठरतो आहे. मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या स्टॉलला भेट देऊन अनेकांनी आपला छंद जपण्याची संधी घेतली आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Unique Stall: तुम्ही कधी 18 व्या शतकातील नोटा आणि नाणी पाहिली का? मुंबईत उभारलाय खास स्टॉल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल