दोन्ही मार्गांवर परिणाम, वेळापत्रक बिघडले
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसनगाव-वासिंद पट्ट्यात एक्स्प्रेस गाडीमध्ये जो बिघाड झाला आहे, तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर थेट परिणाम झाला आहे. एरवी ५-१० मिनिटं उशिरा असणाऱ्या गाड्या आता जास्तच उशिरा असल्याने शाळा कॉलेज आणि ऑफिसला पोहोचणाऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
advertisement
बॉसची बोलणी खावी लागणार
सोमवारचा दिवस आणि त्यात सकाळची वेळ, म्हणजे मुंबईत कामावर जाण्याची सर्वाधिक गर्दीची वेळ. अशा वेळी वाहतूक खोळंबल्याने प्रवाशांची मोठी धावपळ उडाली आहे. अनेक लोकल स्टेशन्सवर प्रवाशांची गर्दी जमा झाली आहे. पहिल्याच दिवशी उशिर झाल्याने आज बॉसची बोलणी खावी लागणार असल्याने प्रवाशांना मनस्ताप होत आहे.
वेळ राखून घराबाहेर पडा
एक्स्प्रेस गाडीत तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तातडीने दुरुस्तीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, ही तांत्रिक अडचण नेमकी कधीपर्यंत दूर होईल आणि रेल्वे वाहतूक पूर्ववत कधी सुरू होईल, याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत वेळ किंवा माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे तुम्ही ऑफिस, शाळा किंवा कॉलेजसाठी घराबाहेर पडत असाल तर लोकलचं वेळापत्रक पाहून आणि थोडा हाताशी वेळ राखूनच घराबाहेर पडा.