मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), दादर, पुणे, नाशिक रोड आणि नागपूर या सहा प्रमुख स्थानकांवर गर्दी नियंत्रणासाठी स्वतंत्र प्रतीक्षा क्षेत्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
Mumbai Local: मध्य रेल्वेचा एक निर्णय अन् लोकल सुसाट सुटणार, मुंबईकरांचा वेळ वाचणार!
या स्थानकांवर प्रतीक्षा क्षेत्र
advertisement
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 1,200 चौ. मीटर, LTT येथे 10,000 चौ. मीटर, पुणे येथे 2,000 चौ. मीटर, नाशिक रोड येथे 1,000 चौ. मीटर, तर नागपूर येथे 1,500 चौ. मीटरचे होल्डिंग क्षेत्र तयार करण्यात आले आहे. या क्षेत्रांमध्ये एकावेळी सुमारे 20,000 प्रवाशांना थांबण्याची सोय उपलब्ध आहे. या होल्डिंग क्षेत्रांमध्ये छप्परयुक्त शेड, पुरेसे प्रकाश व वायुवीजन, पिण्याचे पाणी, फॅन्स, शौचालये, चार्जिंग पॉइंट्स, खाद्यपदार्थ स्टॉल्स आणि घोषणा प्रणाली यांसारख्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेकडून गाड्यांच्या प्लॅटफॉर्म क्रमांकात कोणताही बदल न करता प्रवाशांना अडचण येऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. तसेच गर्दीच्या गाड्या एकाच प्लॅटफॉर्मवर न आणण्याची विशेष काळजी घेतली जात आहे. प्रवाशांच्या चढण्यासाठी आरपीएफ आणि व्यावसायिक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली रांगा तयार केल्या जात आहेत. तिकीट उपलब्धता आणि प्रवासी प्रवृत्तीचे निरीक्षण करण्यासाठी एआय आणि वॉर रूमच्या माध्यमातून रिअल-टाइम ट्रॅकिंग केले जात आहे.
प्रमुख स्थानकांवर सुरक्षा राखण्यासाठी आरपीएफ आणि जीआरपी यांच्यात समन्वय साधला गेला आहे. कार्यक्षम व्यवस्था, सुधारित सेवा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेबद्दलची वचनबद्धता यांसह मध्य रेल्वे सणासुदीच्या काळात प्रवाशांना सुरळीत, सुरक्षित आणि आनंददायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी सज्ज आहे.






