मुंबई : म्हाडाकडून मुंबई आणि ठाणे या शहरात तब्बल 11 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. लवकरच यासाठीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे म्हाडासाठी अर्ज कसा भरायचा, त्यासाठी वयोमर्यादा काय, अर्ज भरताना कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे, याबाबत आपण जाणून घेऊयात.
अर्जदारासाठी पात्रता काय?
म्हाडा लॉट्रीचा फॉर्म भरण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. अर्जदाराकडे अधिवास प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड असण आवश्यक आहे.
advertisement
तुमच्या वार्षिक उत्पनानुसार तुम्हाला कोणत्या घरासाठी अर्ज करता येईल?
अर्जदाराचे मासिक उत्पन्न 25,001 ते 50,000 रुपयांपर्यंत असेल तर ती व्यक्ती लोअर इन्कम ग्रुप (एलआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतो.
अर्जदाराचे मासिक उत्पन्न 50,001 ते 75,000 च्या दरम्यान असेल त्यांना मध्यम उत्पन्न गट (एमआयजी) सदनिकांसाठी अर्ज करता येईल.
अर्जदाराचे मासिक उत्पन्न 75,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास (एचआयजी) सदनिकांसाठी अर्ज करू शकतात.
जर अर्जदाराचे मासिक उत्पन्न रुपये 50,001 ते 75,000 रुपये दरम्यान असेल, तर तो/ती मध्यम उत्पन्न गट (MIG) फ्लॅटसाठी अर्ज करू शकतात.
अर्जदाराचे मासिक उत्पन्न 75,000 रुपये किंवा त्याहून अधिक असल्यास उच्च उत्पन्न गट (HIG) फ्लॅटसाठी देखील अर्ज करू शकतात.
अर्ज कसा भरायचा?
म्हाडा लॉटरी 2024 चा अर्ज ऑनलाइन भरण्यासाठी, म्हाडा प्लॅटफॉर्मच्या https://housing.mhada.gov.in अधिकृत वेबसाईटला भेट द्या. ‘रजिस्टर’ वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला युजरनेमच्या फॉर्मसाठी निर्देश दिले जातील.युजरनेम नाव निवडा आणि पासवर्ड तयार करुन दिलेल्या जागेवर भरा.पुढे दिलेली तुमची सर्व माहिती भरल्यानंतर फॉर्म सबमिट करा. सबमीटच्या आधी तुम्हाला तेथे तुमचा मोबाइल नंबर विचारला जाईल, जो भविष्यातील संपर्कासाठी वापरण्यात येईल.
म्हाडा लॉटरी फॉर्मवर आपण सर्व माहिती भरल्यानंतर, पुष्टीवर क्लिक करा. म्हाडा लॉटरी फॉर्मवर प्रविष्ट केलेल्या सर्व तपशीलांची पडताळणी केली जाईल. अशाप्रकारे तुम्ही म्हाडा लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्ज सबमिट करू शकता.