मुंबई : आज अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आणि कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला आपण बाप्पाला साकडं घालतो. तसेच सर्व देवतांच्या आधी बाप्पाला पुजतो. त्यामुळे लाखो भक्तजनांचे आणि मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी आज अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त भविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
वर्षभरात जितक्या चतुर्थी असतात, त्यापैकी अंगारकी चतुर्थीचे वेगळेच महत्त्व आहे. अंगारकीच्या निमित्ताने सिद्धिविनायकाला आकर्षक आंब्यांच्या फळांची आरास ही करण्यात आली आहे. अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त बाप्पाची विशेष आशिर्वचन महापूजा करण्यात आली. तसेच सोमवारी मध्यरात्री 12 वाजेपासून भविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
advertisement
अंगारकी संकष्टी चतुर्थी: चंद्रदर्शनानं सोडावा उपवास, तुमच्या शहरात किती वाजता दिसेल चंद्र?
अशी आहे व्यवस्था -
तर दुसरीकडे भाविकांच्या सुरक्षेततेसाठी सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं चोख सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. भाविकांची होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन मंदिर न्यास प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे. यात दर्शनासाठी सर्वसामान्य रांग, स्त्रियांची रांग, मुखदर्शन आणि आशिर्वचन पूजेची रांग अशी व्यवस्था केली आहे. तसेच मंडप, विनामूल्य पादत्राणे ठेवणे, वैद्यकीय सुविधा, भाविकांसाठी विनामूल्य पाणी विशेष बससेवा याची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोणत्याही शुभकार्याची सुरुवात आपण बाप्पाला साकडं घालून करतो. सर्व देवतांच्या आधी त्याला पूजतो. म्हणूनच गणरायाला आराध्य दैवत मानलं जातं. वर्षभरात गणपती बाप्पासाठी काही व्रत आवर्जून पाळले जातात. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला बाप्पाची विशेष पूजा केली जाते. ज्येष्ठ महिन्यात येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रतही महत्त्वाचं असतं.