Angarki Chaturthi 2024 : तब्बल 6 लाख भाविक घेणार राजुरेश्वराचे दर्शन, प्रशासनानं केली महत्त्वाची तयारी, असं असणार नियोजन
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
या अंगारकी चतुर्थीला राजूर येथे दर्शनासाठी तब्बल 6 लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. भाविकांच्या सोयीसाठी 65 बसची सोय जालना येथून करण्यात आली आहे. तर 50 बस राजूर येथे मुक्कामी थांबणार आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना : येत्या 25 जून रोजी तब्बल दीड वर्षानंतर अंगारकी चतुर्थी आहे. अंगारकी चतुर्थीला जालन्यातील राजूर येथे गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या अंगारकी चतुर्थीला राजूर येथे दर्शनासाठी तब्बल 6 लाख भाविक येतील, असा अंदाज आहे. भाविकांच्या सोयीसाठी 65 बसची सोय जालना येथून करण्यात आली आहे. तर 50 बस राजूर येथे मुक्कामी थांबणार आहेत. भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक संजय आहिरे यांनी दिली.
advertisement
पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था -
या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी राजूर परिसरात पाच ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली आहे. यात टेंभुर्णी, जालना, चणेगांव, चांदई एक्को आणि भोकरदन रोडवर ही पार्किंग ठेवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी रोडवर वाहने उभी करू नये, पार्किंगमध्येच वाहने पार्क करावी.
छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांना होतोय फायदा, शासकीय दंत महाविद्यालयाचा अनोखा उपक्रम आहे तरी काय?
advertisement
तीन वैद्यकीय पथके तैनात -
advertisement
राजुश्वरांचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना तत्काळ वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने प्रशासनाकडून तीन विशेष वैद्यकीय पथकांची स्थापना केली आहे. ही पथके राजूर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी राहणार आहे. परिसरात अग्निशमन आणि रुणवाहिकाही तैनात आहेत. या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयही केली आहे.
सीसीटीव्हीची नजर -
राजुरेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी असते. या संधीचा फायदा घेत, चोरट्यांकडून मुलांसह महिलांच्या अंगावरील दागिने चोरीला जातात. त्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
advertisement
साध्या वेशात गस्त -
राजूर येथे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. यात 30 वरिष्ठ पोलिस अधिकारी, 230 अंमलदार आणि 300 होमगार्डचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यात साध्या वेशामध्येही पोलीस गस्त घालणार आहेत.
advertisement
दोन्ही नियंत्रण कक्ष -
view commentsराजूर येथे भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनातर्फे दोन कंट्रोल रूमची उभारणी केली आहे. यात एक कंट्रोल रूम सर्वसामान्यांसाठी आहे. या ठिकाणाहून भाविकांना वारंवार ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून सूचना करण्यात येणार आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
June 24, 2024 2:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
Angarki Chaturthi 2024 : तब्बल 6 लाख भाविक घेणार राजुरेश्वराचे दर्शन, प्रशासनानं केली महत्त्वाची तयारी, असं असणार नियोजन


