TRENDING:

Hapus Rate: आंबा आहे की सोनं? देवगडच्या हापूसला रेकॉर्ड ब्रेक दर, पेटीचा भाव पाहिला का?

Last Updated:

Hapus Rate: यंदा फळांचा राजा हापूस दिवाळीआधीच बाजारात दाखल झाला. वाशी मार्केटमध्ये देवगड हापूसला विक्रमी 25000 रुपयांचा दर मिळाला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: फळांचा राजा म्हणजेच आपला हापूस आंबा साधारणपणे जानेवारीच्या सुमारास कोकणातून मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होतो. मात्र यंदा दिवाळीच्या सणातच या ‘राजा’ने आपली आगमन वंदना करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नवी मुंबईतील वाशी एपीएमसी फळ बाजारात देवगडवरून आलेल्या हापूस आंब्याच्या पेटीला तब्बल 25 हजार रुपयांचा विक्रमी दर मिळाल्याने आंबा बाजारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Hapus Rate: आंबा आहे की सोनं? एका पेटीचा भाव 25000 रुपये, देवगडच्या हापूसला रेकॉर्ड ब्रेक दर!
Hapus Rate: आंबा आहे की सोनं? एका पेटीचा भाव 25000 रुपये, देवगडच्या हापूसला रेकॉर्ड ब्रेक दर!
advertisement

या विशेष पेटीची देवगड तालुक्यातील पडवणे गावचे बागायतदार प्रकाश धोंडू शिर्सेकर यांनी तयारी केली होती. त्यांच्या बागेत जुलै महिन्यातच काही झाडांना आगाऊ मोहोर आला होता. त्यांनी त्या झाडांवर विशेष काळजी घेऊन फवारणी व प्लास्टिक कव्हरिंग केली, ज्यामुळे फळधारणा टिकवण्यात यश आलं. परिणामी दिवाळीच्या आधीच त्यांच्या बागेतील पहिली पेटी बाजारात पोहोचली आणि याच पेटीने एपीएमसीच्या इतिहासात नवा विक्रम नोंदवला.

advertisement

मक्याच्या दरात सुधारणा, सोयाबीन आणि कांद्याला आज काय मिळाला भाव? Video

लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर नानाभाऊ जेजुरकर अँड कंपनीकडे ही पेटी दाखल झाली होती. त्यावेळी या आंब्यांची विधिवत पूजा करून काही दिवसांनी लिलावासाठी ठेवण्यात आली. बोली लागल्यानंतर मुंबईतील एका ग्राहकाने ही 6 डझनांची पेटी तब्बल 25 हजार रुपयांना विकत घेतली. व्यापाऱ्यांनी त्या ग्राहकाचं नाव गोपनीय ठेवलं असलं तरी, एवढ्या उच्च दराने खरेदी झाल्याची बातमी बाजारभर चर्चेचा विषय ठरली.

advertisement

View More

साधारणपणे हापूस आंब्याच्या पेटीला 20 ते 22 हजारांचा दर मिळतो; मात्र यंदा दिवाळीपूर्वीच या ‘मुहूर्ताच्या हापूस’ने विक्रमी भाव गाठला. यामुळे कोकणातील बागायतदार आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठा आनंद पसरला आहे.

दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोकणातील हापूस मुंबई बाजारात दाखल होतो. पण यंदा पावसाच्या विलंबामुळे हंगाम थोडा मागे ढकलला जाईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तरीसुद्धा दिवाळीतच हापूस आंबा मुंबईत येणे ही एपीएमसीच्या इतिहासातील पहिलीच घटना ठरली आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
1 की 2 नोव्हेंबर, कोणती एकादशी धरायची? तुळशी विवाहाचे दिवस, मुहूर्त आणि महत्त्व
सर्व पहा

मुंबईकरांसाठी दिवाळीचा गोडवा यंदा आंब्याच्या सुवासाने अधिकच वाढला आहे. फळांचा राजा हापूस पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतोय की, त्याचा दर आणि दिमाख दोन्ही अव्वलच असतात.

मराठी बातम्या/मुंबई/
Hapus Rate: आंबा आहे की सोनं? देवगडच्या हापूसला रेकॉर्ड ब्रेक दर, पेटीचा भाव पाहिला का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल