रेल्वे स्टेशन आणि प्लॅटफॉर्म परिसरात पान आणि गुटखा खाऊन थुंकणाऱ्यांवर रेल्वे अधिनियमच्या कलम 198 अंतर्गत 200 ते 500 रुपयांपर्यंत आर्थिक दंडाची तरतूद आहे. सध्या त्यानुसार प्रवाशांकडून दंड आकारला जातो. आता पश्चिम रेल्वेने स्वच्छतेवर अधिक भर देण्याचे संकेत दिले आहेत. पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. तसेच कारवाईसाठी ‘क्लीन अप मार्शल’ सारखा पर्याय देखील स्वीकारण्याचा विचार सुरू असल्याचे सांगतिले.
advertisement
वडापावमधून पाव गायब होणार! नव्या नियमाचा फटका, नेमंक कारण काय?
तर थेट ठेका रद्द!
रेल्वे स्टेशनच्या स्वच्छतेसाठी रेल्वे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. ‘ऑपरेशन पवित्रा’ अंतर्गत पश्चिम रेल्वेच्या व्यवसायिक विभागाचे अधिकारी स्टेशनच्या सुपरवायझरला व्हीडिओ कॉल करून स्वच्छतेचा आढावा घेत आहेत. या कॉल दरम्यान अस्वच्छता आणि घाण आढळल्यास कंत्राटदारास पहिल्या दोन वेळा सूचना दिली जाते. त्यानंतर देखील अस्वच्छता आढळल्यास तिसऱ्यांदा दंड आकारण्यात येत आहे. सातत्याने अस्वच्छतेच्या तक्रारी येत राहिल्यास ठेका देखील रद्द होऊ शकतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान पश्चिम रेल्वेने मुंबई विभागातील चर्चगेट ते विरारदरम्यान सफाईसाठी 8 हाऊस किपिंग कंत्राटी कंपन्यांची नियुक्ती केली आहे. परंतु, स्टेशनवर अस्वच्छता आढळल्यामुळे त्यांना 17 लाख 84 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.