30 तासांचा मेगाब्लॉक
मध्य रेल्वेने कर्जत यार्डमध्ये पुनर्बांधणीसह आधुनिक सिग्नल प्रणालीची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे शनिवारी, 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.20 ते रविवारी, 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.20 वाजेपर्यंत 30 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या काळात कर्जत ते नेरळ आणि कर्जत ते खोपोली सर्व ट्रेन बंद राहणार आहेत.
advertisement
दरम्यान, कर्जतहून नेरळ आणि खोपोली लोकल सेवा बंद राहणार असली तरी ब्लॉक दरम्यान नेरळ ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) लोकल सेवा सुरु राहील.
Central Railway: दिवाळीआधी रेल्वेचा खोळंबा, शनिवारी पुणे – मुंबई वाहतूक ठप्प, 19 तासांचा मेगाब्लॉक!
4 दिवस खोळंबा
शनिवारी, 11 ऑक्टोबर रोजी ब्लॉक पूर्वी शेवटची लोकल कर्जत ते CSMT सकाळी 11:19 ला कर्जतहून सुटेल. त्यानंतर या मार्गावरील लोकसेवा बंद होईल.
रविवारी, 12 ऑक्टोबर रोजी ब्लॉक नंतरची पहिली लोकल कर्जत ते CSMT संध्याकाळी 7.43 ला कर्जत हून सुटेल.
सोमवारी, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.20 पासून दुपारी 02.20 पर्यंत 3 तासांचा मेगाब्लॉक असल्यामुळे या दरम्यान सर्व ट्रेन बंद राहतील.
मंगळवारी, 14 ऑक्टोबर रोजी पुन्हा सकाळी 11.20 पासून दुपारी 02.20 पर्यंत 3 तासाचा मेगा ब्लॉक असल्यामुळे या दरम्यान देखील सर्व ट्रेन बंद राहतील.