केस गळतीने त्रस्त आहात? फक्त हे उपाय करा, केस गळती होईल कायमची दूर
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवारी, 31 ऑगस्ट रोजी उपनगरीय विभागामध्ये आवश्यक कामांसाठी मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. निवेदन जारी करताना, मध्य रेल्वेने जारी केलेल्या निवेदनात असे नमूद केले केले की, सेंट्रल रेल्वे आणि हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या (Slow) मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. हा मेगाब्लॉक सकाळी 10:55 ते 03:55 पर्यंत राहणार आहे. या काळामध्ये मुंबईकरांचे नक्कीच हाल होण्याची शक्यता आहे.
advertisement
150 ट्रकमध्ये गणपतीच्या मूर्ती, कचऱ्यात ठेवणार, गावकऱ्यांनी रोखलं; Video Viral
मेगाब्लॉकच्या काळात, सीएसएमटीहून सकाळी 10:48 ते दुपारी 03:45 दरम्यान येणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील सर्व लोकल विद्याविहारपर्यंत डाऊन फास्ट (सीएसटीवरून सुटणारी लोकल) मार्गावरून धावतील. तर, मेगाब्लॉकच्या काळात, भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला या स्थानकावर ट्रेन थांबणार आहेत आणि पुढे त्यानंतर ट्रेन धीम्या मार्गावर परत येणार आहेत. 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10:19 ते दुपारी 03:52 दरम्यान घाटकोपरहून सुटणाऱ्या अप स्लो (सीएसटीकडे जाणारी लोकल) मार्गावरील सर्व लोकल सीएसएमटीपर्यंत अप फास्ट मार्गावर वळवल्या जातील. तर, मेगाब्लॉकच्या काळात, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा येथे थांबवणार आहेत.
रेल्वेच्या ग्रुप 'डी'च्या परीक्षा केव्हा होणार? असं कराल Hall ticket डाऊनलोड...
हार्बर मार्गावर, कुर्ला ते वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील सर्व लोकल सकाळी 11:10 ते दुपारी 04:10 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. तर, सीएसएमटी ते वाशी/बेलापूर/पनवेल दरम्यानची डाऊन सेवा सकाळी 10:34 ते दुपारी 03:36 या काळात बंद राहणार आहे. तर, पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीला जाणारी अप सेवा सकाळी 10:17 ते दुपारी 03:47 दरम्यान या काळात बंद राहणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचणी येऊ नयेत यासाठी, मध्य रेल्वे सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष लोकल गाड्या चालवणार आहे. हार्बर लाईनवरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10:00 वाजेपासून सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे- वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल.