31 जुलै रोजी मुंबईतील वांद्रे आणि खारमधील अनेक भागांत पाणीपुरवठा तात्पुरता बंद राहील. तर इतर भागात पाण्याचा दाब कमी राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.
Mumbai Rain: श्रावणात वारं फिरलं, मुंबई, ठाण्याच्या हवामानात मोठे बदल, आजचा हवामान अंदाज
या भागात पुरवठा बंद राहणार
advertisement
मुंबईतील काही भागात 14 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये हनुमान नगर, लक्ष्मी नगर, युनियन पार्क मार्ग क्रमांक 1 ते 4, पाली हिल आणि च्युईम गावाचा काही भागात दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. नर्गिस दत्त मार्ग, पद्मश्री देव आनंद मार्ग (जिम जॅग मार्ग) येथे रात्री 10 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. तर पाली माला मार्ग परिसरात सकाळी 10 ते दुपारी 12.30 या काळात पाणी पुरवठा होणार नाही.
या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा
मुंबईतील कांतवाडी परिसराचा काही भाग, पाली नाका, पाली गावठाण, शेरली, राजन आणि माला गावाच्या काही भागात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. खारदांडा कोळीवाडा, च्यईम गावठाण, दांडपाडा, गझधरबंध झोपडपट्टी परिसर, खार पश्चिमेच्या काही भागात सायंकाळी 5.30 ते रात्री 10 वाजेपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.