नियोजित काम 1 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता सुरू होऊन 2 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहील. घाटकोपर (पूर्व) येथील छेडानगर जंक्शन परिसरामधील 3000 मिमी मुख्य जलवाहिनीला अमर महल बोगदा शाफ्टशी जोडण्याचे काम हा या प्रकल्पाचा प्रमुख टप्पा आहे. जलवाहिन्यांचे जाळे अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हे काम करण्यात येत आहे.
advertisement
Weather Alert: नोव्हेंबर अखेर सूर्याला ताप, कोकणात वारं फिरलं, मुंबई-ठाण्यातील आजचं हवामान अपडेट
या कामामुळे शहर विभागातील ए, बी, सी, ई, एफ दक्षिण, एफ उत्तर तसेच पूर्व उपनगरातील एम पूर्व, एम पश्चिम, एल, एस आणि एन या 11 विभागांचा पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. काही भागांत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून काही ठिकाणी कमी दाबाने पाणी उपलब्ध होईल.
महापालिकेने या कालावधीत नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच काम पूर्ण झाल्यानंतर सुरुवातीच्या काही तासांत पाणी गढूळ किंवा कमी दाबाने येण्याची शक्यता असल्याने काळजी घेण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा पूर्ववत सुरू झाल्यानंतर परिस्थिती सामान्य होईल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.






