सध्याच्या काळात समृद्धी महामार्गावरून भिवंडी, ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. खासकरून आमनेपासून ठाण्यापर्यंतचा प्रवास सध्या दीड ते दोन तासांचा होतो. तसेच ठाण्यापासून मुंबईच्या दिशेने जाताना देखील वाहनांना कोंडीचा सामना करावा लागतो.
ही समस्या लक्षात घेऊन एमएमआरडीएने इस्टर्न फ्री वेचा छेडानगर ते आनंदनगर दरम्यान विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आनंदनगर ते साकेत हा उन्नत मार्गदेखील तयार केला जात आहे. या प्रकल्पांमुळे साकेत ते मुंबई प्रवास भविष्यात वेगवान होईल आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल.
advertisement
समृद्धी महामार्गाची लांबी आणि खर्च किती? जाणून घ्या सविस्तर माहिती
समृद्धी ते साकेत: 29 किलोमीटर
साकेत ते आनंदनगर: 8.24 किलोमीटर
आनंदनगर ते छेडानगर: 12.955 किलोमीटर
छेडानगर ते फोर्ट: 18 किलोमीटर
छेडानगर ते आनंदनगर दरम्यानचा मार्ग 40 मीटर रुंदीचा असून त्यात सहा लेन असतील. या मार्गासाठी अंदाजे 2,683 कोटी रुपये खर्च होणार आहेत. तर आनंदनगर ते साकेत हा उन्नत मार्ग देखील 40 मीटर रुंदीचा असून सहा लेनचा असेल. यासाठी 1,874 कोटी रुपये खर्च केले जातील.
वाहतूक तज्ज्ञ डॉ. शंकर विश्वनाथ म्हणाले, समृद्धी महामार्ग ते ठाण्यापर्यंत हा नवीन मार्ग कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे लोकांना रोजच्या प्रवासात लवकर आणि सुरक्षित पोहोचता येईल. तर सामाजिक कार्यकर्ते संतोष दौंडकर म्हणाले, समृद्धी मार्गावरून येणाऱ्या वाहनांना आमनेपासून ठाण्यापर्यंत येताना मोठा त्रास होतो. एमएमआरडीएचा हा मार्ग या समस्येवर मोठा दिलासा ठरेल. या प्रकल्पांमुळे नुसते वाहतूक कोंडी कमी होणार नाही, तर मुंबई आणि ठाणेकरांना दैनंदिन प्रवास वेगवान, सुरक्षित आणि आरामदायक होईल, अशी अपेक्षा आहे.