मुंबईला मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, विहार, तुळशी आणि राज्य सरकारच्या अप्पर वैतरणा, भातसा धरणांतून पाणीपुरवठा होतो. या सातही ठिकाणी पाण्याचा समाधानकारक साठा झाला आहे. मोडक सागर 99.99 टक्के भरले असून, तानसा 98.41टक्के, मध्य वैतरणा 94.76 टक्के आणि भातसामध्ये 86.57 टक्के पाणी आहे. याशिवाय, अप्पर वैतरणा 82.76 टक्के आणि तुळशी तलाव 84.64 टक्के भरले आहेत. विहार तलावामध्ये सध्या केवळ 23.28 टक्के साठा आहे. सात जलाशयांचा एकूण साठा समाधानकारक असल्याने मुंबईला पाणीटंचाईचा धोका नाही.
advertisement
Mumbai Water News: मुंबईकरांनो आता पाण्याचे 'नो टेन्शन', मुख्य धरणातील पाणीसाठ्यात वाढ
मागील काही वर्षांशी तुलना केली असता यंदाच्या वर्षीचा पाणीसाठा थोडा कमी असला, तरी 2023 पेक्षा अधिक आहे. 2024 मध्ये 13,05,948 एमएलडी आणि 2023 मध्ये 11,72,967 एमएलडी साठा झाला होता. अद्याप पावसाळा सुरू असल्यामुळे आगामी काळात पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण चांगले राहिले तर काही तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही.
प्रशासन आणि जल प्राधिकरणाने योग्य नियोजन केलं तर उपलब्ध पाणीसाठा अधिक कार्यक्षमतेने वापरता येईल. एकूणच मुंबईकरांना या वर्षी पाणीटंचाईची चिंता करण्याची गरज नाही.